Premium

Video : “खोबऱ्याचं सारण, सुंदर कळ्या अन्…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री स्पृहा जोशीने बाप्पासाठी बनवले खास मोदक, पाहा व्हिडीओ

spruha joshi made special ukdiche modak
स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक

गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. त्यामुळे गणपतीच्या ११ दिवसांमध्ये घरोघरी विविध प्रकारचे मोदक बनवले जातात. अभिनेत्री स्पृहा जोशीने सुद्धा लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सायली अर्जुनला शिकवणार मोदक, ‘ठरलं तर मग’च्या गणेशोत्सव विशेष भागात काय होणार? जुई गडकरीने केला खुलासा

तांदळांच्या पीठाची उकड काढून तयार केलेल्या मोदकांचं गणपतीच्या दिवसांमध्ये विशेष आकर्षण असतं. गूळ घालून तयार केलेल्या ताज्या खोबऱ्याचं सारणाचे हे मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक बनवणं ही एक कला आहे, त्यामुळे प्रत्येकाला हे मोदक जमतातच असं नाही. काहीं लोकांना ते जमतात, तर काहींचा आकार बिघडतो, अनेकवेळा हे मोदक फुटतात. अशा सगळ्यासांठी अभिनेत्री स्पृहा जोशीने मोदक बनवतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : “ते मला रात्री घरी घ्यायला यायचे अन्…”, अमिताभ व जया बच्चन यांच्या डेटिंगच्या दिवसांबद्दल दिग्गज अभिनेत्रीने सांगितल्या आठवणी

प्रथम उकड काढलेल्या पीठाची पाती बनवून स्पृहाने त्यात ओल्या खोबऱ्याचं सारण भरलं. त्यानंतर सुंदर अशा कळ्या काढून अभिनेत्री मोदक वळत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्पृहाने “गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा!! हॅप्पी मोदक डे” असं लिहिलं आहे.

हेही वाचा : Video : “आमच्या घरी गणपती बसत नाही पण…”, क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना बाप्पाची ओढ; नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

दरम्यान, स्पृहाने शेअर केलेल्या मोदकांच्या रेसिपीच्या व्हिडीओवर सगळ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मोदक छान बनला”, “सर्वगुण संपन्न”, “मॅडम तुम्ही सुगरण आहात” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress spruha joshi made special ukdiche modak for ganpati bappa sva 00

First published on: 19-09-2023 at 13:51 IST
Next Story
सुबोध भावेच्या मुलांनी बाप्पासाठी केला आकर्षक ‘चांद्रयान-३’चा देखावा; पाहा फोटो