‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होतं आहे.
हेही वाचा- ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल केदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले “याचा शेवट…”
चित्रपटात सुरुचीने शशीची (वंदना गुप्ते) मुलगी चिन्मयीचे पात्र साकारले आहे. या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्री सुरुचीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने चित्रपट करताना आलेला अनुभव शेअर केला आहे. तसेच चित्रपटला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.
सुरुची अडाळकरची पोस्ट
क
सर्वप्रथम “बाईपण भारी देवा” या सुंदर कलाकृतीचा मला भाग होता आलं ह्यासाठी @kedarshindems sir आणि @officialjiostudios @saneness_ sir यांचे खूप आभार… सातत्याने चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक कलाकार करत असतोचं पण तो करत असताना जेव्हा एखाद्या मोठ्या कलाकाराची साथ मिळते तेव्हा ती कला काही वेगळीचं बहरते, इथे तर मला १ नाही तब्बल ६ गुणी कलाकरांबरोबर काम करण्याचा मान मिळाला याचा आनंद कायमसाठी पुरेल. ह्या सिनेमाच्या dialoguesनी काम करत असतानाचं आमच्या मनात घर केलं होतं जे आज तुमच्या मनात होताना आम्ही पाहतोय आणि तुम्हा प्रेक्षकांची मायेची थाप ही अनुभवतोय.. जी सिनेमासाठी आणि त्या सिनेमा मधल्या प्रत्येकासाठी फार महत्वाची असते म्हणूनचं तुम्ही या सिनेमावर जो प्रेमाचा वर्षाव केलात त्या बद्दल आम्ही कायमचं तुमचे ऋणी राहू.असेच आशीर्वाद मायबाप प्रेक्षक तुमचे कायम पाठीशी रहुद्या
सुरुचीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर झी मराठीवरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून सुरुचीला ओळख मिळाली होती. .या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. सध्या सुरुची सोनी टीव्हीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्ने’ मालिकेत काम करत आहे.
दरम्यान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. दहा दिवसांमध्ये या चित्रपटाने एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
