scorecardresearch

“’वेड’ या सिनेमाने…”, रितेश देशमुखच्या चित्रपटाबाबत तेजस्विनी पंडितचं मोठं विधान

Ved Marathi Movie: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाबाबत तेजस्विनी पंडितने केलेलं विधान चर्चेत

“’वेड’ या सिनेमाने…”, रितेश देशमुखच्या चित्रपटाबाबत तेजस्विनी पंडितचं मोठं विधान
तेजस्विनी पंडितचं 'वेड'बाबत मोठ वक्तव्य. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. तिने आजवर अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दिलखेचक अदा व सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या तेजस्विनीला मात्र रितेश देशमुखच्या चित्रपटाचं ‘वेड’ लागलं आहे.

तेजस्विनीने नुकतीच ‘एबीपी माझा’च्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर हजेरी लावली. इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे तेजस्विनीने प्रेक्षकांशी संवाद साधत दिलखुलासपणे मुलाखत दिली. या मुलाखतीत तेजस्विनीने तिचा आगामी चित्रपट ‘बांबू’बद्दल भाष्य केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.

हेही वाचा>>“वेड लावून झालं, आता…”, मराठी दिग्दर्शकाने रितेश देशमुखच्या चित्रपटाबाबत केलेली पोस्ट चर्चेत

हेही पाहा>>…अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो

रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाबाबतही या मुलाखतीत तेजस्विनीने मोठं विधान केलं आहे. तिच्या आगामी ‘बांबू’ चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन बघण्याबाबत प्रेक्षकांना आवाहन करताना तेजस्विनीने ‘वेड’ चित्रपटाचं कौतुक केलं. “रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीसाठी दारं खुली केली आहेत”, असं तेजस्विनी म्हणाली.

हेही वाचा>> ‘वेड’बाबत रितेश देशमुखची मोठी घोषणा; चित्रपटामध्ये होणार मोठे बदल, म्हणाला “२० जानेवारीपासून…”

तेजस्विनीची निर्मिती असलेला ‘बांबू’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर समीर चौगुले, स्नेहल शिदम, शिवाजी साटम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 15:59 IST

संबंधित बातम्या