Adinath Kothare on mother Nilima Kothare: मातृदिनानिमित्त अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आईबरोबरचे जुने, लहानपणाचे फोटो शेअर करत आठवणी सांगितल्या आहेत. आईमुळे आयुष्याला योग्य दिशा मिळाल्याच्या भावानदेखील अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. आता अभिनेता आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, आईचे जुने फोटोदेखील शेअर केले आहेत.

महेश कोठारेंची पत्नी निलिमा कोठारे आहेत यशस्वी उद्योजिका

हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “तू नेहमी पाठीशी आहेस. बस एवढं पुरेसं आहे. स्वतः साठी कधीच काही न मागता, तू नेहमी आमचा विचार आधी करतेस, आमच्या सुखात स्वतःला सुखी समजतेस. आम्हाला मोठी स्वप्न बघायला शिकवलंस आणि कितीही संकटं आली तरी, स्वतःवर विश्वास ठेवायचा. उद्या तुझी वेळ येणार हे सतत बिंबवलंस. सकारात्मकता, भोळी आशा आणि प्रेम…या तुझ्या सुपर पॉवर्स. माझं आणि माझ्या वडिलांचं तू इंधन आहेस.”

पुढे त्याने लिहिले, “आमची वंडर वूमन..सूर्य किरण. आय लव्ह यू मम्मी. हॅपी मदर्स डे”, असा लिहित अभिनेत्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच, त्याने असेही लिहिले, “आमच्या जगाचा भार सांभाळण्या व्यतिरिक्त माझ्या आईने व तिच्या मैत्रीणीने स्वत:ची यशस्वी स्टायलिंग कंपनी देखील उभी केली आहे. द एन क्रिएशन्स असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी गेली १५ वर्षे कार्यरत आहे. या जगातील सर्व मातांना मनापासून अभिवादन.” असे लिहित आई निलीमा कोठारे गेल्या १५ वर्षांपासून यशस्वीपणे स्टायलिंग कंपनी चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आदिनाथच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे आई.
प्रेमळ आईला मातृदिनाच्या आभाळभर शुभेच्छा”, दुसऱ्या एकाने लिहिले, “छान”, एकाने लिहिले, “क्यूट”, आणखी एकाने लिहिले, “पहिला फोटो पाहिल्यानंतर समजते की तुमची मुलगी अगदी तुमच्यासारखीच आहे”, आणखी एकाने लिहिले, “माझा छकुला”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

आदिनाथ कोठारेबद्दल बोलायचे तर तो नुकताच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डिटेक्टिव्ह धनंजय: रहस्यजाल झी ५ मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. याबरोबरच, तो नुकताच नशीबवान या सीरिजमध्येदेखील प्रमुख भूमिकेत होता. काहीच दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तसेच, अभिनेत्याने दिग्दर्शित केलेला पाणी या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते.

दरम्यान, आगामी काळात आदिनाथ कोठारे कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.