‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे प्रेक्षकांसाठी नवा चित्रपट घेऊन आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘सनी’. १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाचे प्रिरिलीज करण्यात आले आहे. पुण्याप्रमाणे ठाण्यात या चित्रपटाचे प्री रिलीज शो ठेवण्यात आले होते. ज्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे कलाकारांच्याबरोबरीने ठाण्यातील चित्रपटगृहात पोहचला होता. चित्रपट संपल्यानंतर त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. त्याने प्रेक्षकांशी संवाद साधला आणि पोस्ट करत त्यांना धन्यवाद म्हंटले. ललित प्रभाकर, क्षिती जोग हे चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. तसेच हेमंतने पुण्यातील शोचे व्हिडीओ शेअर केले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला ठाणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मात्र नंतर चित्रपटाला राजकीय वळण मिळाले

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

नवऱ्याबरोबर ट्रॅक्टर चालवत शेतात रमली ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; व्हिडीओ व्हायरल

चित्रपटाची कथा ललित प्रभाकर म्हणजेच ‘सनी’ शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसतो मात्र पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होत आहे. असं म्हणतात, लांब गेल्यावरच आपल्या घराचं महत्त्व कळतं असाच काहीसा अनुभव ‘सनी’ला येत असल्याचे दिसते. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडेलकर त्याच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. कॅफे मालक असलेली वैदेही म्हणजे क्षिती जोग एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित, या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. तसेच अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी ‘सनी’चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्वनी पंडित सहनिर्माते आहेत.