बायकोच्या मांडीवर डोकं ठेवत अविनाश नारकर यांनी शेअर केला फोटो, लग्नाच्या २७ वर्षानंतरही ऐश्वर्या यांना म्हणतात 'बब्बू' | aishwarya narkar birthday husband avinash narkar share post on instagram and romantic photo of celebrity couple see details | Loksatta

X

बायकोच्या मांडीवर डोकं ठेवत अविनाश नारकर यांनी शेअर केला फोटो, लग्नाच्या २७ वर्षानंतरही ऐश्वर्या यांना म्हणतात ‘बब्बू’

ऐश्वर्या नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश नारकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

बायकोच्या मांडीवर डोकं ठेवत अविनाश नारकर यांनी शेअर केला फोटो, लग्नाच्या २७ वर्षानंतरही ऐश्वर्या यांना म्हणतात ‘बब्बू’
ऐश्वर्या नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश नारकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्या नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश नारकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिका साकारत आहेत. रुपाली राजाध्यक्ष हे त्यांचं मालिकेमधील पात्र प्रेक्षकांच्याही पसंतीस पडत आहे. ऐश्वर्या यांचा ८ डिसेंबरला (गुरुवारी) वाढदिवस होता. याचनिमित्त ऐश्वर्या यांचे पती अविनाश नारकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

ऐश्वर्या यांच्याबरोबरच अविनाशही मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या व अविनाश यांच्या लग्नाचा २७वा वाढदिवस होता. अविनाश नारकर यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्तही पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली होती.

आता ऐश्वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश यांनी रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ते म्हणाले, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव्ह. तुझ्या मनातील सर्व इच्छा, आशा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांची तुझ्या मनाप्रमाणे पूर्तता होवो बब्बू.”

आणखी वाचा – अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…

अविनाश यांनी ऐश्वर्या यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आहे. तसेच ते एकटक त्यांच्याकडे हसतमुखाने बघत असल्याचं फोटोमधून दिसून येतं. ऐश्वर्या यांना अनेक सेलिब्रिटी मंडळींनी तसेच चाहत्यांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:04 IST
Next Story
अशोक सराफ यांच्या एका सल्ल्याने बदललं सायली संजीवचे आयुष्य, म्हणाले…