गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य देव ( Ajinkya Deo ) खूप चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांचा नवा चित्रपट ‘घरत गणपती’ प्रदर्शित झाला. २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तिसऱ्या आठवड्यात ‘घरत गणपती’ चित्रपटाने धमाकेदार पदार्पण केलं आहे. या चित्रपटात बऱ्याच वर्षांनी अजिंक्य देव व अश्विनी भावे जोडी झळकली. याशिवाय अभिनेता भुषण प्रधान, निकिता दत्त, प्रीती तेलंग, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले असे तगडे कलाकार मंडळी ‘घरत गणपती’ चित्रपटात पाहायला मिळत आहेत. अशातच अजिंक्य देव यांच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ज्यामध्ये अजिंक्य यांनी रमेश देव यांच्या व्यसनाविषयी व प्रसिद्धविषयी सांगितलं आहे.

अभिनेते अजिंक्य देव ( Ajinkya Deo ) यांनी नुकतीच ‘लोकशाही’ वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, सुपरस्टारच्या घरी जन्म झालाय ही गोष्ट तुम्हाला कधी जाणवली? तुम्ही याचा फायदा शाळेत किंवा कॉलेजमध्ये घेतला आहे का? तेव्हा अजिंक्य देव म्हणाले, “तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. आमच्या घरात कधी पार्ट्या होत नसतं. एकावेळेला बाबा चेन स्मोकर होते. माझा जन्म झाल्यानंतर त्यांनी सिगारेट सोडली. त्यांनी मला यामागचा प्रसंग सांगितला होता. ते मला घेऊन येत होते तेव्हा मला त्यांच्या हाताला सिगारेटचा वास आला होता. त्यामुळे मी त्यांच्यावर खूप रागावलो होतो. पण त्या दिवशीपासून त्यांनी सिगारेट सोडली. त्यांनी परत कधीच सिगारेटला हात लावला नाही.”

Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Vijay Kadam And Pallavi Joshi Betwee Special Relationship, know
विजय कदम आणि पल्लवी जोशी यांच्यातील खास नातं तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या…
Meenakshi Seshadri recalls working with Vinod Khanna
“आम्ही अश्लील विनोद करायचो”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितली विनोद खन्ना यांच्याबरोबरची आठवण; म्हणाली, “माझ्या वडिलांना…”
Amitabh Bachchan
“एक दिवस असा येईल…”, राजेश खन्नांनी अमिताभ बच्चन यांचा अपमान केल्यावर जया बच्चन यांनी केलेलं भाकीत
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार भजनाची तालीम कशी करतात पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल

पुढे अजिंक्य देव ( Ajinkya Deo ) यांनी वडिलांच्या लोकप्रियतेचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “आई बिनधास्त टॅक्सीने फिरायची. एकेदिवशी आम्ही टॅक्सीने गेलो होतो. तेव्हा बाबा रानडे रोडला संध्याकाळी ७ वाजता आम्हाला घ्यायला आले. आम्ही त्यांची वाट बघत बसलो होतो. तेव्हा समोरून गाडी आली. आमच्याकडे फिएट गाडी होती. त्याच्यातून बाबा उतरले. मी अजिबात इथे अतिशयोक्ती करत नाहीये. बाबा जसे उतरले तसा रानडे रोड पूर्णपणे भरला. रस्ता बंद करायची वेळ आली होती. त्यांना बघायला इतके लोक जमले होते.”

हेही वाचा – Video: आठवड्याची सुरुवात भांडणाने! निक्कीने इतरांचे कपडे फेकत घातला वाद, अंकिता वालावलकरला दिला धक्का अन्…

बाबांची क्रेझ होती – अजिंक्य देव

“तेव्हा आईची माया होती. आईवर लोक खूप प्रेम करायचे. पण बाबांची क्रेझ होती. बाबा खऱ्या अर्थाने स्टार होते. त्यांचं एक स्वतःचं वलय होतं. तेव्हा मी रानडे रोडला ती गर्दी बघून घाबरलो होतो”, असं अजिंक्य देव ( Ajinkya Deo ) यांनी सांगितलं.