Video: ढोलवादन, लेझीम अन्…; डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकाश व सायलीचा जलवा, व्हिडीओ व्हायरल

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आकाश व सायली गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीमधील शोभायात्रेत सहभागी झाले होते.

akash thosar and sayli patil
आकाश ढोसर आणि सायली पाटीलचं ढोलवादन. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर त्याच्या आगामी ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आकाश मुख्य भूमिकेत असून सध्या तो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटात आकाशसह अभिनेत्री सायली पाटीलही मुख्य नायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आकाश व सायली गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीमधील शोभायात्रेत सहभागी झाले होते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या या शोभायात्रेत आकाश चक्क ढोल वाजवताना दिसून आला. पुणेरी स्टाइलने ढोलवादन करत आकाश शोभायात्रेत सहभागी झाला होता. सायली पाटीलनेही आकाशबरोबर ढोलवादन करत त्यावर ठेका धरला होता. आकाश व सायली या शोभायात्रेत लेझीमही खेळताना दिसून आले.

हेही वाचा>> “१०-२० वर्ष ब्रेक घे” नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले “रिमेक…”

हेही वाचा>> ४७व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने दिला बाळाला जन्म, २३व्या वर्षी ताई झाल्यानंतर फोटो शेअर करत म्हणाली…

आकाशने शोभायात्रेतील हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने “गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…घर बंदुक बिरयानी च्या निमित्ताने डोंबिवलीकरांची ही भेट अविस्मरणीय राहील”, असं कॅप्शन दिलं आहे. आकाश व सायलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> सतीश कौशिक यांची हत्या झाली म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले “तो आयुष्यभर…”

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटात आकाश व सायलीसह अभिनेते सयाजी शिंदेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच नागराज मंजुळेही या चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘घर बंदुक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 12:38 IST
Next Story
Video: गुढीपाडव्याच्या दिवशीही अमृता खानविलकरला आवरला नाही आवडत्या गाण्यावर नृत्य करण्याचा मोह, म्हणाली…
Exit mobile version