मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता म्हणजेच अमेय वाघ. ‘फास्टर फेणे’, ‘गर्लफ्रेंड’, ‘झोंबिवली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अमेयने प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मुळे प्रसिद्ध झालेला अमेय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकाच रोमॅंटिक आहे.

अमेय सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. आता अभिनेत्याने त्याच्या बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. अमेयची पत्नी साजिरी देशपांडे हीचा आज (१८ जून रोजी ) वाढदिवस आहे. यानिमित्ताने अमेयने तिच्यासाठी एक स्पेशल फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा… “मी कॅमेरासमोर नग्न…”, ‘हीरामंडी’मधील ‘त्या’ सीनबद्दल ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली,”खूप निर्लज्ज..”

अमेयने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा आणि साजिरीचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिलं, “प्रिय साजिरी…मी बाल्कनीतल्या झाडांना पाणी घालायचं विसरीन, कचरा बाहेर काढून ठेवायचं विसरीन , बाहेर जाताना बेडरूमची खिडकी बंद करायची विसरीन …पण आठवणीने तुझ्या कानात आय लव्ह यू द मोस्ट (I love you the most) म्हणायचं कधीच विसरणार नाही! Happy birthday Gonds”

हेही वाचा… VIDEO: “ए राजाजी…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्रींनी केला भन्नाट डान्स, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “विरोचकाचा मृत्यू…”

अमेय वाघने बायकोसाठी शेअर केलली ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “कुठून सुचत साधं सोपं सरळ व्यक्त होणं,खूप छान…” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “कॅप्शन खूप भारी आहे”. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी साजिरीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हृता दुर्गुळे, श्रेया बुगडे, गौरी नलावडे, हेमंत ढोमे, सुयश टिळक यांनी साजिरीला टॅग करत शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा… “शाळेतल्या एका मुलीसाठी…”, वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध गायकाने सोडलं होतं घर, म्हणाला, “मी तिच्याकडे गेलो…”

१३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये अमेयने त्याची बालमैत्रीण आणि प्रेयसी साजिरी देशपांडे हिच्याशी पुण्यात लग्नगाठ बांधली.

दरम्यान, अमेयच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जग्गू अनी ज्युलिएट’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता. विक्रम पटवर्धन दिग्दर्शित अमेयचा ‘फ्रेम’ नावाचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.