कलाक्षेत्रामध्ये काम करणारे काही कलाकार आज राजकीय क्षेत्रामध्येही सक्रिय आहेत. काही मराठी कलाकारांनीही राजकारणामध्ये प्रवेश केला. आदेश बांदेकर, दिपाली सय्यद, सुशांत शेलार, दिगंबर नाईक यांसारख्या मंडळींनी राजकीयक्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अमोल सध्या अभिनयासह राजकारणातही सक्रिय आहेत. पण त्याचबरोबरीने कामाच्या गोंधळात ते त्यांच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देताना दिसतात.
आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…
अमोल यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. ही ऐतिहासिक मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या मालिकेमध्येही काम करत असताना त्यांचा फिटनेस दिसून आला. आपल्या कामाबरोबरच अमोल यांनी आपल्या शरीरयष्टीकडे तसेच आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष दिलं. आजही ते नियमित व्यायाम करतात. त्यांनी असाच एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
अमोल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते सुर्यनमस्कार करताना दिसत आहेत. एकाच वेळी त्यांनी चक्क १०८ सुर्यनमस्कार केले. गेले कित्येक दिवस त्यांचा हा प्रयत्न सुरु होता. अखेरीस त्यांचा हा प्रयत्न पूर्ण झाला. ४५ मिनिटं १५ सेकंदांमध्ये त्यांनी १०८ सुर्यनमस्कार पूर्ण केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्यासारखा होता. “१०८ सुर्यनमस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न” असं अमोल यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं.
त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेही आवाक् झाले. अमोल यांनी १०८ सुर्यनमस्कार केले पण ते थकले नाहीत. १०८ सुर्यनमस्कार पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अमोल यांचं कौतुक केलं आहे. खूप मस्त, तुम्ही आम्हाला नेहमीच प्रेरित करता, तुम्हाला सलाम अशा अनेक कमेंट चाहत्यांनी अमोल यांच्या या व्हिडीओवर केल्या आहेत.