Amruta Khanvilkar New Home : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण नव्या गाड्या घेतात. तर, काहीजण नव्या घरात गृहप्रवेश करतात. आज दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचं औचित्य साधत अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचं अनेक वर्षांपासूनच स्वप्न सत्यात उतरवलं आहे. अभिनेत्रीने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या घराची पहिली झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

मुंबईत हक्काचं, मोठं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीत नावलौकिक मिळवलेल्या अमृताचं ( Amruta Khanvilkar ) हे गृहस्वप्न साकार झालं आहे. सध्या तिच्या या नव्या घरात इंटिरिअरचं काम सुरू आहे. एक सुंदर अशी कविता लिहित अभिनेत्रीने नवीन घर घेतल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ

हेही वाचा : Bigg Boss 18 : चौथ्या आठवड्यात ‘हा’ सदस्य झाला एलिमिनेट, घराबाहेर जाण्यापासून शिल्पा शिरोडकरसह सुरक्षित झाले ‘हे’ सहा सदस्य

अमृता खानविलकरची नव्या घरासाठी खास पोस्ट

चला भेट झालीच आपली
कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं,
आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोज सुरू होता.

तर, ही आपली पहिली दिवाळी…
तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत,
मला काय आवडतं, काय नाही,
मनातलं गुपित, शांततेतलं ….सारं काही
हळूहळू तुला कळेलच
तुलाही मला खूप काही सांगायचं असेल…
माझी पूर्ण तयारी आहे.

तू अजून हळूहळू आकार घेतोयस,
तुझ्या कानाकोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करतेय.
तू ही अगदी माझ्या हो ला हो म्हणतोयस ….
आवडतंय मला…

लवकरच भेटू
नव्या कोऱ्या भिंतींसह
नव्या आठवणी बनवण्यासाठी
नवं आयुष्य उलगडण्यासाठी- Happy Diwali ( Amruta Khanvilkar )

हेही वाचा : Bigg Boss Marathi – होणाऱ्या नवऱ्यासह धनंजय पोवारच्या घरी पोहोचली अंकिता! लाडक्या डीपी दादांना केली भाऊबीज; फोटो आले समोर

हेही वाचा : इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल

दरम्यान, अमृताचा ( Amruta Khanvilkar ) वाढदिवस २३ नोव्हेंबर रोजी असतो. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर आणि वाढदिवसाच्या महिन्यात पहिल्याच दिवशी अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मुक्ता बर्वे, हृता दुर्गुळे, पूजा सावंत, श्रेया बुगडे, प्राजक्ता माळी, मंजिरी ओक, भार्गवी चिरमुले यांनी कमेंट्स करत अमृताला या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader