scorecardresearch

Video : भर पार्टीत बायकोला नाचताना पाहून भारावला अमृता खानविलकरचा नवरा, अभिनेत्रीची आईही बघतच बसली अन्…

अमृता खानविलकरला भर पार्टीत डान्स करताना पाहून तिचा अगदी भारावून गेला होता. यादरम्यानचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

Video : भर पार्टीत बायकोला नाचताना पाहून भारावला अमृता खानविलकरचा नवरा, अभिनेत्रीची आईही बघतच बसली अन्…
अमृता खानविलकरला भर पार्टीत डान्स करताना पाहून तिचा अगदी भारावून गेला होता. यादरम्यानचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. काही दिवसांपूर्वीच अमृताने तिचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केली. अगदी बॉलिवूड स्टाइल बर्थ डे पार्टीचं तिने आयोजन केलं होतं. तिच्या या पार्टीला हिंदीसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीदरम्यानचाच अमृताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

आणखी वाचा – “न्यूटन मोठाच पण ज्ञानेश्वर माऊली त्यापेक्षा…” शरद पोंक्षेंनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नेटकरीही करताहेत कौतुक

बॉलिवूडमधील कलाकार एखाद्या चित्रपटाची सक्सेस पार्टी किंवा बर्थ डे पार्टीचं आयोजन करतात. मराठीमध्ये हे फार कमी पाहायला मिळतं. पण अमृताने पहिल्यांदाच आपल्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. तिच्या या पार्टीला तिचा पती हिंमाशू मल्होत्रा तसेच तिची आईही उपस्थित होती.

पाहा व्हिडीओ

अमृताने पार्टीमध्ये ‘चंद्रा’ गाण्यावर नृत्य सादर केलं. तिचं हे गाणं आजही प्रचंड गाजतं. अमृताने या गाण्यावर पार्टीमध्ये डान्स करावा अशी सगळ्यांचीच इच्छा होती. अमृताही अगदी बेभान होऊन नाचली. अमृताला नाचताना पाहून हिमांशू अगदी भारावून गेला. यावेळी अमृताची आईही तिच्याकडे एकटक पाहतच होती.

आणखी वाचा – “कधी बायको म्हणून…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नीना कुळकर्णी भावूक, एकत्र केलेला ‘तो’ चित्रपट ठरला शेवटचा

हिंमाशूने आपल्या पत्नीचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “तुला डान्स करताना पाहणं म्हणजे अति सुंदर.” हिंमाशूला अमृताचं नृत्यकौशल्य प्रचंड आवडतं. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओला हजारो लाइक्स व व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 21:40 IST

संबंधित बातम्या