Amruta Khanvilkar dance with Ashish Patil: अमृता खानविलकर जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या डान्ससाठीदेखील लोकप्रिय आहे.

२००९ मधील ‘नटरंग’मधील वाजले की बारा हे गाणे असो किंवा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील चंद्रा गाणे असो, अमृताने नृत्याद्वारे कायमच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

तसेच, २०१५ मध्ये अमृता आणि तिचा पती हिंमाशु मल्होत्रा यांनी नच बलिये या डान्स रिअॅलिटी शोचा सातवा सीझनदेखील जिंकला होता. तसेच, ती नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलबरोबर ‘सुंदरी : द हिस्ट्री ऑफ लावणी’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

आता अमृताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आशिष पाटीलबरोबर एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या चर्चेत असलेल्या ‘राजा राजा’ या गाण्यावर अमृता आणि आशिषने ताल धरला आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या या परफॉर्मन्सवर नेटकरी कौतुकाचा वर्षावर करीत आहेत.

आता अमृताने हा व्हिडीओ शेअर करीत लिहिलेय की, ‘राजा राजा’ गाण्यावर मी आशिष पाटीलबरोबर डान्स करीत आहे. पुढे तिने हे उत्तम गाणे असल्याचे म्हटले. तसेच, या गाण्यासाठी तिने हितेश मोडकला शुभेच्छा दिल्या.

हितेश मोडकनेदेखील कमेंट करत आभार मानले. तसेच अमृता आणि आशिषचे कौतुक केले.

नेटकरी म्हणाले….

आता नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “लय भारी”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “कडक”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “एक नंबर”, एका नेटकऱ्याने लिहिले, “दोघांनीही सुंदर डान्स केला”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आशीषसर तुम्ही खूप छान डान्स केला”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

हितेश मोडकने ‘राजा राजा’ गाण्याला संगीतबद्ध केले आहे. या मूळ गाण्यात अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता आयुष संजीव दिसत आहे. त्या गाण्यातील अमृताच्या दाक्षिणात्य लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते.

दरम्यान, अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता आगामी काळात अमृता कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.