Amruta Khanvilkar shares Italy Trip Video: अमृता खानविलकर, सोनाली खरे, नेहा पेंडसे या मराठमोळ्या अभिनेत्री सध्या ट्रिपसाठी इटलीला गेल्या आहेत. त्या इटलीमधील विविध ठिकाणचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या फोटो, व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. आता अमृताने एक व्हिडीओ शेअर करीत सर्वांची मने जिंकली आहेत.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातील गाण्यावर डान्स करीत असल्याचे दिसत आहे. सेनोरिटा या गाण्यातील काही ओळींवर ती डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या एकापेक्षा एक डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, शेवटी अमृता, नेहा, सोनाली तिघीही आनंदाने ओरडत असल्याचे दिसत आहे.

अमृता खानविलकर, नेहा पेंडसे व सोनाली कुलकर्णी (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

हा व्हिडीओ शेअर करताना अमृताने, “हे घडले आहे, यासाठी जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमाला दोष देऊ शकता. आमची जिंदगी ना मिलेगी दोबारा आहे”, अशी मजेशीर कॅप्शन लिहून, तिने सोनाली व नेहा यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. व्हिडीओमध्ये तिघींनीही सुंदर ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा लूक लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच, कलाकारांनीही कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले आहे. क्रांती रेडकरने, “वाह, वाह, वाह”, असे लिहीत त्यांचे कौतुक केले. मंजिरी ओकने इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. तर, सुहृद गोडबोले यांनी मजेशीक कमेंट करीत लिहिले, “आम्हाला घेऊन गेला असता, तर आपण एक फिल्म करून आलो असतो.”

अमृता खानविलकर, नेहा पेंडसे व सोनाली कुलकर्णी (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कमाल”, “किती मजा”, “बेस्ट ट्रायो”, “किती छान”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

अमृता खानविलकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

दरम्यान, याआधी अमृताने गेट रेडी विथ मी हा व्हिडीओदेखील शेअर केला होता. त्यामध्येही नेहा व सोनालीची झलक पाहायला मिळाली होती.