मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ‘Female Friendship’ बद्दल भाष्य केलं होतं. सोनाली खरे, नेहा पेंडसे आणि प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत असं तिने सांगितलं होतं. आता याच गर्ल्स गँगबरोबर अमृता फिरायला गेली आहे.

अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे या तिघीजणी नुकत्याच ‘इटली’ फिरायला गेल्या आहेत. अमृताने ‘आम्ही तीन तिघी’ म्हणत या ट्रिपदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमृता, नेहा आणि सोनालीच्या एअरपोर्ट लूकनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुरुवातीला अनेकांना प्रश्न पडला होता की, या तिघी नेमक्या कुठे फिरायला जाणार आहेत? यावेळी अमृताने पिझ्झा, पास्ता, तिरामिसू अशी हिंट चाहत्यांना दिली होती. यावरून या तिघी इटली फिरायला चालल्या आहेत, हे स्पष्ट झालं होतं.

amruta khanvilkar neha pendse sonali khare girls trip
अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे

अमृता इटलीला पोहोचल्यावर म्हणते, “तुम्ही ते रील्स व्हिडीओ पाहिले असतील ना, ज्यामध्ये आपण स्वत:चं सामान, बॅगा उचलून प्रवास करत असतो. ते सगळं आम्ही अनुभवतोय. कारण, आता आम्ही बसने फ्लोरेन्सला चाललोय आणि सामान-बॅगांचं तर विचारू नका. या बॅगांनी दम काढलाय आमचा…दम!”

amruta khanvilkar girls trip
सोनाली खरे व अमृता खानविलकर
amruta khanvilkar neha pendse sonali khare girls trip
अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे

आता अमृता, नेहा आणि सोनाली या तिघीजणी मिळून इटलीत काय धमाल करणार हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.