मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. प्रसाद ओक त्याची पत्नी मंजिरी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांची गेली बरीच वर्षे एकमेकांशी घट्ट मैत्री आहे. मध्यंतरी या तिघांचा डान्स करताना व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आज मंजिरी ओकच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून अभिनेता प्रसाद ओक घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीच्या काळात प्रचंड कष्ट करून प्रसादने आज मनोरंजनसृष्टीत नाव कमावलं आहे. या सगळ्या काळात अभिनेत्याला त्याच्या बायकोने मोलाची साथ दिली. आज मंजिरीच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने बायकोला शुभेच्छा दिल्याच आहेत परंतु, या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Kalyan, Director, Sacred Heart School,
कल्याण : सेक्रेड हार्ट शाळेच्या संचालकाला विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी अटक
fire, slipper , factory,
वसईच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करणाऱ्या  कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू
Charge sheet filed in Salman Khan house firing case
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी आरोपपत्र दाखल
mihir shah worli hit and run case marathi news
Worli Hit and Run Case: अपघाताआधी मिहीरनं जुहूच्या बारमध्ये १८,७३० रुपयांचं बिल भरलं होतं; मित्रांसोबत पार्टीचं CCTV फूटेज पोलिसांच्या हाती!
woman crushed her lover with a stone
पिंपरी- चिंचवड: मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले; व्हिडीओ व्हायरल
Ashwini Koshta mother
पुणे पोर्श अपघात: आरोपीला जामीन मिळताच अश्विनी कोस्टाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Crime News, Man Rape Bid and Woman Murder
महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, हत्या आणि मृतदेहाचे तुकडे ठेवले दोन ट्रेन्समध्ये, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?
Neet action against Subodh Kumar Singh after NET paper leak
‘एनटीए’प्रमुखांची उचलबांगडी; नीट, नेट पेपरफुटीनंतर सुबोध कुमार सिंह यांच्यावर कारवाई

हेही वाचा : अदिती-सिद्धार्थने तेलंगणातील ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला? अभिनेत्रीने पहिल्यांदाच सांगितलं कारण…

अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मंजिरी केक कापून आनंद साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा खास व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता लिहिते, “Happy Birthday Queen…तुमच्या कुटुंबाचा तू सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहेस. माझं आणि आम्हा सर्वांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बाकी सगळं तुला माहितीच आहे…अशीच आनंदी राहा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : “महाराष्ट्राची लाडकी”, नम्रता संभेरावसाठी प्रसाद खांडेकरने लिहिलं खास पत्र अन् दिलं सुंदर गिफ्ट; म्हणाला, “नमा तुला…”

अमृताच्या पोस्टवर मंजिरीने “थँक्यू सो मच लव्ह” अशी कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. या सेलिब्रेशनला प्रसाद ओक, मंजिरी, त्यांची दोन्ही मुलं, अमृता खानविलकर ही मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा : “राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण, दुसरीकडे माझं घर विकलं”, प्रसाद ओकने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला, “बँकेचे हप्ते, कर्ज…”

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाला, “माझ्या आयुष्यात तू नसतीस तर…”

दरम्यान, आता लवकरच ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या यशानंतर प्रसाद-अमृता पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या नव्या चित्रपटात अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार आहेत. लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करण्यात येणार आहे.