मराठी अभिनेत्री आणि उत्तम डान्सर अमृता खानविलकर ही चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. गेल्यावर्षी प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटात अमृताच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता अशाच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी अमृता सज्ज आहे.

अमृता खानविलकर लवकरच ‘कलावती’ या सिनेमात झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर लॉंच केलं गेलं आहे, यात अमृताचा चेहेरा पूर्णपणे दिसला नसला तरी तिची करारी नजर आणि एकूणच चित्रपटाचा बाज या पोस्टरमधून समजला आहे. अजूनतरी या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आली नसली तरी पोस्टरवरून ही भूमिका ‘चंद्रा’सारखीच असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : “याचा सीक्वल लिहून तयार…” नसीरुद्दीन शाह यांचं ‘जाने भी दो यारों’च्या पुढील भागाबद्दल मोठं वक्तव्य

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहेत. तब्बल ४ वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नारवेकर, तेजस्विनी लोणारी, हरिष दुधाणे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर ओंकार भोजने, दीप्ती धोत्रे आणि युट्यूबर नील सालेकरही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘कलावती’ चित्रपटाचं पोस्टर आणि त्यातून दिसणारी अमृता खानविलकरची झलक प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. एकूणच हा चित्रपट भव्य असणार यात काहीच शंका नाही. नेटकऱ्यांना यासाठी संजय जाधव आणि अमृता खालविलकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अजूनतरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.