अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृताने अभिनयाच्या जोरावर केवळ मराठी कलाविश्वातच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटरंग’, ‘चंद्रमुखी’, ‘गोलमाल’ या चित्रपटांमधून अभिनयाचा ठसा उमटवणारी अमृता ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’, ‘मलंग’ या हिंदी चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.

अमृताने नुकतंच प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या ‘पटलं तर घ्या’ या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने हिंदी सिनेमा काम करण्याचा अनुभव सांगितला. अमृताने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटांतही काम केलं आहे. याबाबतही तिने मुलाखतीत भाष्य केलं. ती म्हणाली, “राम गोपाल वर्मा यांच्या कॉन्ट्रॅक्ट या चित्रपटात मी काम केलं होतं. त्या चित्रपटात माझे तीन-चारच सीन होते. त्यानंतर त्यांनी मला लगेचच दुसऱ्या चित्रपटाची ऑफर दिली. ‘फूंक’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं. राम सरांबरोबर मी लागोपाठ तीन चित्रपट केले होते. त्यामुळे मला ‘रामूज’ असं संबोधलं जायचं. माझ्याबद्दल असं का छापून येत आहे, हे पहिलं मला कळतचं नव्हतं. एकाच दिग्दर्शकाबरोबर तीन किंवा जास्त चित्रपट केल्यानंतर असं बोललं जातं हे नंतर मला कळालं”.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”

हेही वाचा>> “तशी फिगर नसल्यामुळे…”, अमृता खानविलकरने सांगितला हिंदी सिनेमात काम करण्याचा अनुभव

“हिंदी चित्रपटात करिअर सुरू ठेवायला हवं होतं, याबाबत खंत वाटते का?” असा प्रश्नही मुलाखतीत अमृताला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली “हो, खंत अशी नाही पण सुरुवातीला मी खूप घाबरायचे. मला भीती वाटायची. हिंदी भाषेवर माझं प्रभुत्व नव्हतं. त्यामुळे मी हिंदीत काम सुरू केलेलं तेव्हा मला लोक व्हर्नक्युलर(प्रादेशिक भाषा बोलणारी) म्हणायचे. मी चांगली दिसत नाही, तशी फिगर नाही असं मला वाटायचं”.

हेही वाचा>> आदिल खानच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळाली धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “माझे व्हिडीओ…”

“मी तेव्हा हिंदी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे. पण तितकं चांगलं हिंदी मला बोलता यायचं नाही. नंतर मी हिंदी, उर्दू या दोन्ही भाषांचा अभ्यास केला. त्याकाळी मी खूप घाबरायचे. त्यामुळे मी जास्त प्रयत्नही केले नाहीत. तेव्हा मार्गदर्शन करणारंही कोणी नव्हतं. आता जी अमृता तुम्हाला दिसते, तशी मी तेव्हा नव्हते, या गोष्टीची मला खंत आहे”,असंही अमृता पुढे म्हणाली. अभिनेत्रीबरोबरच अमृता एक उत्तम नृत्यांगणाही आहे. ‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ या गाण्यांमधून तिने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.