Amruta Khanvilkar and Himmanshoo Malhotra: अभिनेत्री अमृता खानविलकर ही कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. विविध रील्सच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसाच्या आधीच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिला भेटवस्तू पाठवल्या होत्या. त्याचा व्हिडीओ अमृताने सोशल मीडियावर शेअर केला होता.

तसेच, अभिनेत्री सोनीली खरेनेदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अमृताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आता आणखी एका व्यक्तीच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून तिचा पती हिमांशू आहे. अमृताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही पोस्ट त्याने शेअर केली आहे.

Award Banner

हिमांशू मल्होत्रा पोस्ट शेअर करत म्हणाला…

हिमांशूने या पोस्टमध्ये अमृताला टॅग करत लिहिले, “अमृता तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या वर्षांत तुला खूप यश, प्रेम आणि आनंद मिळो.”

पुढे त्याने लिहिले, “स्वतःसाठी उभं राहण्याचं, आयुष्याला स्वत:च्या मर्जीनं घडवण्याचं आणि एक वेगळी छाप उमटवण्याचं तू उदाहरण आहेस. तुला खूप प्रेम. आपण एकमेकांना दोन दशकांपासून ओळखतो. वेळ किती पटकन निघून जातो.”

या पोस्टसह अभिनेत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता केक कापताना दिसत आहे. तिच्याबरोबर तिच्या कुटुंबातील सर्वजण आहेत. केक कापल्यानंतर ती सर्वांना देते. ती आणि हिंमाशूलादेखील एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. शेवटी अमृताने सर्वांबरोबर फोटोदेखील काढले आहेत.

आता हिमांशूच्या या पोस्टवर अनेकांनी अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, अमृता आता आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.