scorecardresearch

‘पावनखिंड’च्या यशानंतर अंकित मोहन पुन्हा एकदा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

‘पावनखिंड’ चित्रपटातील त्याच्या कामाचं सर्वत्र प्रचंड कौतुक झालं होतं. या चित्रपटात त्यांनी रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली होती.

‘पावनखिंड’च्या यशानंतर अंकित मोहन पुन्हा एकदा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

गेल्या काही महिन्यांपसून मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पदावर आणण्यासाठी अनेक निर्माते दिग्दर्शक प्रयत्न करताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’, ‘शेर शिवराज’, ‘हर हर महादेव’ हे ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तर आता नुकतीच आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘वीर मुरारबाजी.’

नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. या चित्रपटातून पुरंदरचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हे पोस्टर या चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केल्याचं पोस्टमध्ये म्हटलं. तर या चित्रपटात अभिनेता अंकित मोहन मुरारबाजी देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

यापूर्वी अंकितने ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. ‘पावनखिंड’ चित्रपटातील त्याच्या कामाचं सर्वत्र प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटात त्यांनी रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली होती. तर त्यानंतर आता अंकित पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे.

हेही वाचा : ‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याने शेअर केला रायगडावरील फोटो, म्हणाला “सांगा सरकार…”

१६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता. त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले आणि मोठा पराक्रम घडवला. हे सगळं या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 12:46 IST

संबंधित बातम्या