scorecardresearch

Premium

Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांची झलक समोर

केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.

maharashtra shahir teaser

केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक सना शिंदेही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत होते. तर आता अखेर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. या टीझरची सुरुवात अंकुश चौधरी साकारत असलेल्या शाहीर साबळे यांची झलक दिसण्यापासून होते. तर त्या पाठोपाठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही या टीझरमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर या टीझरमधून शाहीर साबळे यांनी केलेलं कामही उलगडत जातं.

wahida rehman
गोष्ट पडद्यामागची: हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘गाईड’ चित्रपटाची गोष्ट, देव आनंद यांच्या सिनेमात वहिदा रेहमान यांची वर्णी कशी लागली?
shyamchi aai poster
‘श्यामची आई’ चित्रपट ‘या’ महिन्यात होणार प्रदर्शित, पहिलं पोस्टर समोर
mrunmayee-deshpande
सुभेदार चित्रपटानंतर मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरीजमध्ये एन्ट्री; पोस्टर प्रदर्शित
teen-adkun-sirtaram
‘तीन अडकून सीताराम’चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा

आणखी वाचा : Photos: दाराबाहेर पत्रपेटी, जुना लाकडी दरवाजा…’असं’ आहे शाहीर साबळे यांचं मुंबईतील घर

हा टीझर आऊट होताच प्रेक्षकांनी या टीझरला उत्तम प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा : Photos: असा संपन्न झाला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा, चित्रीकरणाला दणक्यात सुरुवात

आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’प्रमुख मा. राज ठाकरे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. या खास प्रसंगी शाहीर साबळे यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, आणि पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ankush chaudhari starrer shahir sable biopic named maharashtra shahir teaser out rnv

First published on: 20-03-2023 at 13:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×