केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक सना शिंदेही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत होते. तर आता अखेर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. या टीझरची सुरुवात अंकुश चौधरी साकारत असलेल्या शाहीर साबळे यांची झलक दिसण्यापासून होते. तर त्या पाठोपाठ शिवसेना
आणखी वाचा : Photos: दाराबाहेर पत्रपेटी, जुना लाकडी दरवाजा…’असं’ आहे शाहीर साबळे यांचं मुंबईतील घर
हा टीझर आऊट होताच प्रेक्षकांनी या टीझरला उत्तम प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
आज ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’प्रमुख मा. राज ठाकरे
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.