ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या त्यांच्या ‘आदि अनंत’ या आगामी चिकत्रपटातून झळकणार आहेत. यामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे त्यांच्या नातवाच्या भूमिकेत असून हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशताच आता या कार्यक्रमाच्या म्युझिक लाँचला अशोक सराफ यांनी चक्क तबला वाजवल्याचं पाहायला मिळालं.
अशोक सराफ हे हरहुन्नरी अभिनेते आहेतच पण उतारवयातही ते तितक्याचे जिदीने आणि आवडीने काम करताना दिसतात. यामुळे त्यांचं अनेक जण कौतुक करत असतात. मात्र आता त्यांनी चक्क तबला वाजवला असून लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्याबरोबरची त्यांची जुगलबंदी लक्ष वेधून घेत आहे.
नुकताच ‘आदि अनंत’ या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. तर नुकतंच चित्रपटातील राहुल देशपांडे यांचं ‘दिगंबरा दिगंबरा’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. १२ नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी म्युझिक लाँचला चित्रपटातील कलाकार अशोक सराफ. संकर्षण कऱ्हाडे आणि सखी गोखले यांनी हजेरी लावली. यावेळी राहुल देशपांडे हेच गाणं गाताना दिसले तर दुसरीकडे अशोक सराफ त्यादरम्यान तबला वाजवताना दिसले. या दोघांच्या या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत तर वाढलीच पण अशोक सराफ यांनी अनेकांचं लक्ष वेधलं. अशोक सराफ हे उत्तम तबला वादक आहेतच याबद्दल त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनीही मुलीखतींमधून सांगत त्यांचं कौतुक केलं आहे, मात्र आता त्यांच्या चाहत्यांना अनेक दिवसांनंतर अशोक सराफ थेट तबला वाजवता या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.
दरम्यान, ‘आदि अनंत’ हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी यांचं दिग्दर्शक केलं आहे तर स्वत: संकर्षणने चित्रपटाचं लिखान केलं आहे. आतापर्यंत नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार संकर्षण आता चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार असून पहिल्याच चित्रपटातून तो थेट अशोक सराफ यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करत आहे.
आजोबा आणि नातवाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आजच्या तरुण पिढीच्या संघर्षावरही प्रकाश टाकणारा असल्याचं संकर्षणने म्हटलं आहे.
