चित्रपट हे संवादाचं, विचारांची देवाण-घेवाण करण्याचं खूप प्रभावी माध्यम आहे. चित्रपट अनेकानेक कारणांनी महत्त्वाचा असतो. चित्रपटातून मनोरंजन होतंच, पण चित्रपट विचार देतो, नव्या कल्पना देतो, जगण्याची उमेद देतो, प्रेरणा देतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सरला एक कोटी’ या चित्रपटानंतर एक अनोखी घटना घडली आहे. हा चित्रपट पाहून भारावलेल्या एका प्रेक्षकानं चित्रपटातील नायिकेच्या नावावरून प्रेरित होऊन आपल्या नवजात मुलीचं नावही ‘सरला’ ठेवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पिरतीच्या फडात गं…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने प्रेमात? ‘चला हवा येऊ द्या’च्या ‘त्या’ अभिनेत्रीने शेअर केला रोमँटिक फोटो

या चित्रपटात ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता, तसंच समीक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केलं होतं. अशातच बीडमधील या घटनेनंतर चित्रपटाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

“ते एकमेकांना भेटले अन् मला…” Sidharth Malhotra-Kiara Advani साठी करण जोहरची खास पोस्ट

बीड जिल्ह्यातील अशोक तपसे यांच्या घरी नुकताच मुलीचा जन्म झाला. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘सरला एक कोटी’ चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहून भारावलेल्या अशोक तपसे यांनी चित्रपटातील नायिकेच्या नावावरून आपल्या लेकीचं नाव चक्क सरला ठेवलं. ही बातमी व्हायरल होताच चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आहे. ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाने आणखी एक सरला जन्माला घातली. ही घटना अतिशय आनंददायी असल्याचं दिग्दर्शक नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok tapse kept daughter name sarla after watching marathi movie sarla ek koti hrc
First published on: 08-02-2023 at 11:19 IST