Actor Atul Parchure Passes Away : मराठी कलाविश्वातील चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. गेली काही वर्षे ते कर्करोगामुळे त्रस्त होते. मात्र, मोठ्या जिद्दीने त्यांनी पुन्हा एकदा ‘खरं खरं सांग’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं.

आयुष्यातील या कठीण काळात कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली होती. अतुर परचुरेंची ( Atul Parchure ) इंडस्ट्रीतील अनेकांशी घट्ट मैत्री होती. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. सुप्रिया पिळगांवकर, शुभांगी गोखले, सुबोध भावे, जयवंत वाडकर यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

atul parchure passed away battle with cancer
५ सेमीचा ट्यूमर, डॉक्टरांकडून चुकीचे उपचार…; अतुल परचुरेंनी सांगितलेला ‘तो’ कठीण काळ, अखेर झुंज अपयशी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Atul Parchure Passed Away ashok saraf emotional reaction
अतुल परचुरेंनी ‘या’ चित्रपटात साकारलेली अशोक सराफ यांच्या बालपणीची भूमिका; ज्येष्ठ अभिनेते आठवण सांगताना झाले भावुक
atul parchure passed away funeral at Shivaji park
“पु.लं’बरोबर जोडणारा पूलच ढासळला…”, कुशल बद्रिकेची पोस्ट, अतुल परचुरेंच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
Bigg Boss 18 Chahat Pandey Proposed marriage to salman khan
Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”
atul parchure passed away
“दिसणं नाही, उंची नाही, नोकराची कामं मिळतील…”, अतुल परचुरेंनी सांगितलेला इंडस्ट्रीतील अनुभव, म्हणाले होते…
Rinku rajguru childhood photo with father
फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? जगभरात ११० कोटी रुपये कमावणाऱ्या सिनेमात केलंय काम
prathamesh parab dances with wife suraj chavan zapuk zupuk song
Video : प्रथमेश परबचा बायकोसह ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला सूरज चव्हाण, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : ५ सेमीचा ट्यूमर, डॉक्टरांकडून चुकीचे उपचार…; अतुल परचुरेंनी सांगितलेला ‘तो’ कठीण काळ, अखेर झुंज अपयशी

मराठी कलाकारांच्या पोस्ट

सुप्रिया पिळगांवकर लिहितात, “लाडक्या मित्रा असं व्हायला नको होतं, खूप लढलास! खूप सहन केलेस . तुझी उणीव सदैव भासणार. तुझ्या खट्याळ हास्याची आठवण सदैव राहील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो आणि तुझ्या कुटूंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ति…”

“अतुल… रोज भेट, एकत्र काम, सतत संपर्कात असणं ह्यातलं काहीच नसताना आपण “दोस्त”होतो…मुकुलची पहाटेची मैफिल आपण गाठली,एकत्र अनुभवली…उरल्या त्या आठवणी…खूप आठवण येणार बघ…” अशी पोस्ट शेअर करत शुभांगी गोखले यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : Atul Parchure : “अतुल परचुरेंच्या चाहत्यांपैकी एक या नात्याने मी…”, एकनाथ शिंदेंची चतुरस्त्र अभिनेत्याला श्रद्धांजली

“परचुरे तुमचा पुढचा प्रवास सुखाचा होवो…मोठी लढाई जिंकून आला होतात पण… कायम स्मरणात असाल परचुरे” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्री विशाखा सुभेदारने अतुल परचुरेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा : Atul Parchure Death : अभिनेता अतुल परचुरेंचं निधन, पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड

तसेच “अतुल मित्रा… तुझा हा असाच मिश्किल, अवखळ चेहरा आणि त्यामागे एक खोल विचारी माणूस… अजून खूप काळ बघायचा होता…आपल्याला लहान मुलांसाठी किती कार्यक्रम करायचे होते…असा कसा गेलास” अशी पोस्ट शेअर करत गायक सलील कुलकर्णी यांनी अतुल परचुरेंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.