Bhushan Pradhan New Home Photos : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अभिनेता भूषण प्रधानने त्याच्या आई-वडिलांना खास भेट दिली आहे. आपलं स्वप्न साकार करत भूषणने त्याच्या पालकांसह नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचे खास फोटो अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटांमुळे अभिनेता भूषण प्रधान घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: तरुणाईमध्ये त्याची सर्वाधिक क्रेझ आहे. नुकतीच एक सोशल मिडिया पोस्ट शेअर करत भूषणने आपल्या सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. भूषणने नवीन घर विकत घेतलं असून, घराच्या किल्ल्या अभिनेत्याने गुडघ्यावर बसून आपल्या आई-बाबांना सुपूर्द केल्या आहेत.
हेही वाचा : Video : आधी ‘हिरवा निसर्ग’ आता ‘सुपारी फुटली’! ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये आहे सोनू निगमचं खास गाणं, व्हिडीओ आला समोर
भूषणच्या नव्या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी देत भूषणने एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
नवीन घर घेतल्यावर भूषण प्रधानची खास पोस्ट
अभिनेता ( Bhushan Pradhan ) लिहितो, “गेल्या ६ महिन्यांपासून मी कल्पना देखील केली नव्हती, एवढं प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही सर्वांनी मला दिलेत. ‘जुनं फर्निचर’ आणि ‘घरत गणपती’ या दोन्ही चित्रपटांना भरघोस प्रेम मिळालं. ‘जुनं फर्निचर’मुळे आपल्या पालकांचं वय वाढत असताना त्यांची आणखी काळजी कशी घ्यायची, त्यांना आनंदी कसं ठेवायचं हे फार जवळून ओळखता आलं. तर, ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने कौटुंबिक गणेशोत्सव, सणाचं महत्त्व, त्यातला गोडवा जाणावला.”
“आता माझं आणखी एक स्वप्न साकार झालं आहे. तुम्हा सर्वांबरोबर शेअर करताना आनंद होतोय की, मी माझ्या पालकांसाठी नवीन घर घेतलं आहे. त्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम, त्याग सगळं काही या जागेत सामावलं आहे. गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिले आणि हे स्वप्न साकार झालं. तुमच्याबरोबर ही आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी आणखी दुसरा शुभदिवस असूच शकत नाही. एक नवीन सुरुवात…मनात केवळ कृतज्ञतेचा भाव आहे आणि सोबतीला आहेत कौटुंबिक बंध जे कायम टिकतात! गणपती बाप्पा मोरया!” असं भूषणने ( Bhushan Pradhan ) त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणेच्या घरी आली नवीन पाहुणी; खरेदी केली आलिशान गाडी, कुटुंबासह शेअर केला फोटो
दरम्यान, भूषणच्या ( Bhushan Pradhan ) नव्या घराच्या फोटोंवर कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुलेखा तळवलकर, सुकन्या मोने, ऋतुजा बागवे, पल्लवी पाटील, अनुषा दांडेकर, श्रुती मराठे, मेघना एरंडे अशा असंख्य सेलिब्रिटींनी भूषणचं या नव्या घरासाठी कौतुक केलं आहे.