‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. यंदाच्या पर्वात सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सहभागी झाली होती. अपूर्वाने तल्लख बुद्धी व उत्तम खेळाच्या जोरावर टॉप २ मध्ये स्थान मिळवलं होतं. परंतु तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
‘बिग बॉस’नंतर आता मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अपूर्वा ऐतिहासिक मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘रावरंभा’ या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अपूर्वा सज्ज झाली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती अपूर्वाने दिली आहे.
‘रावरंभा’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटातून एक अनोखी प्रेमकहाणी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली असून नुकतीच चित्रपटाच्या टीमने साताऱ्यातील एका कार्यक्रमात हजेरी लावली. ‘रावरंभा’ चित्रपटात अपूर्वा नेमळेकरसह शंतनू मोघे, अशोक समर्थ, मोनालिसा बागल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट १२ मेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘आभास हा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या अपूर्वाने अनेक मालिका व नाटकांमध्ये काम केलं आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील तिने साकारलेली ‘शेवंता’ ही भूमिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली होती.