Video: ‘वेडात मराठे…’ चित्रपटासाठी खूप मेहनत घेतोय ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे, जीममधील व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेचा व्हिडीओ व्हायरल

jay dudhane gym video
'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणे. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा ऐतिहासिक मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

जय दुधाणे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. जयचा जीममधील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जय व्यायाम करताना दिसत आहे. जयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महेश मांजरेकरांबरोबर चित्रपटातील इतरही कलाकार दिसत आहेत.

हेही वाचा>> “उर्फी जावेद तृतीयपंथी आहे” प्रसिद्ध अभिनेत्याचा अजब दावा; म्हणाला, “तिने…”

जीममधील या व्हिडीओला जयने “बायसेप्स विथ गुरुजी…माझे दोन पाठिंबे…महेश सर, प्रविण सर काय बोलत असतील?” असं कॅप्शन दिलं आहे. जयचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. याआधीही ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचे शूटिंगदरम्यानचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.

हेही वाचा>> “अशोक मामांना भेटणं…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात जय दुधाणेबरोबर उत्कर्ष शिंदे, प्रविण तरडे, विशाल निकम हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 10:17 IST
Next Story
“त्यांना महात्मा गांधींच्या…”, एकेरी उल्लेख करत शरद पोंक्षेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले, “वीर सावरकर अन्…”
Exit mobile version