‘शहंशाह’, ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘दिलवाला’, ‘परिवार’, ‘लव्ह मॅरेज’, ‘हमला’, ‘औरत तेरी यही कहानी’, ‘दहलीज’, ‘महागुरू’, ‘मेरा जवाब’, ‘दामिनी’, चित्रपटाची ही नावं वाचताच समजलं असेल की ८०, ९०च्या दशकात बॉलीवूड गाजवणारी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? आपल्या अभिनयासह नृत्याने, सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मीनाषी शेषाद्री. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे. वयाच्या साठाव्या वर्षी देखील मीनाक्षी या व्हिडीओत तितक्याच सुंदर नाचताना पाहायला मिळत आहेत. मीनाक्षी शेषाद्री यांचा व्हिडीओ पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

प्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलनं मीनाक्षी शेषाद्री यांच्याबरोबर नाचतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मीनाक्षी यांच्यासह नृत्य करण्याचा अनुभव आशिषने कॅप्शनमधून लिहिला आहे. त्यानं लिहिलं आहे, “खऱ्या दामिनीबरोबर…सगळ्यांच्या आशीर्वादनं मला मीनाक्षी शेषाद्री मॅडम यांच्याबरोबर नृत्य करण्याची संधी मिळाली. मी याआधी त्यांना फक्त मोठ्या पडद्यावर पाहिलं होतं. पण त्यांच्याबरोबर नृत्यदिग्दर्शन आणि काम करण्यासाठी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्याच्याबरोबर नृत्य करताना माझ्यातलं लहान मुलं खूप उत्सुक होतं. मॅम तुम्ही फक्त अदाकारी आणि डान्स सुंदर करत नाही तर तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात. खूप नम्र आहात. ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे. भविष्यातही असे अनेक व्हिडीओ करण्याची आशा आहे.”

हेही वाचा – Video: मराठी अभिनेत्याचा स्विमिंग पूलमध्ये ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर मजेशीर डान्स, हटके स्टेप्सनं वेधलं लक्ष

या व्हिडीओत, आशिष पाटीलनं मीनाक्षी शेषाद्री यांच्याबरोबर रेखा यांचं ‘पिया बावरी’ गाण्यावर सुंदर नृत्य केलं आहे. बऱ्याच काळानंतर मीनाक्षी यांचं नृत्य व अदाकारी पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा – कोकणातल्या ‘मुंज्या’चं प्रेक्षकांना लागलं वेड, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, १०० कोटींचा आकडा केला पार

अभिनेत्री क्रांती रेडकर, पूजा सावंत, संस्कृती बालगुडे, श्रेया बुगडे, प्रार्थना बेहेरे, अक्षया नाईक, मंजिरी ओक, सुकन्या मोने, मेघा घाडगे, भाग्यश्री मोडे, गणेश आश्चर्या, मानसी नाईक, मेघा एरांडे, सारिका नवाथे, अशा अनेक कलाकारांनी आशिष व मीनाक्षी यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच “आशिष तुझा परफॉर्मन्स नेहमीच सुंदर व लाजबाब. तुझ्या या मेहनतीला तोड नाही. आज तू खऱ्या दामिनीबरोबर नाचताना डोळे दिपून गेले. दोघेही एक नंबर. मीनाक्षी मॅम तर खूप नृत्यात तरबेज आहेत. पण तू तर एकदम जबरदस्त”, “अप्रतिम”, “ओएमजी…व्वा…तुम्ही दोघांनी खूपच सुंदर परफॉर्म केलंय”, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.