अभिनेता जितेंद्र जोशी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या जितेंद्रने चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. ‘दुनियादारी’, ‘काकण’, ‘गोदावरी’, ‘पोस्टर गर्ल’, ‘तुकाराम’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेला जितेंद्र आता रोहित शेट्टीची निर्मिती असलेल्या चित्रपटात झळकणार आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी निर्मित ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जितेंद्रने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

हेही वाचा>> ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया ७’ चे टॉप सहा स्पर्धक समोर, कोण ठरणार विजेता?

“एक दिवस रोहित शेट्टी सरांच्या कार्यालयातून संपर्क होतो, बोलावलं जातं, समोर स्वतः रोहित सर आणि त्यांच्यासोबत विहान सूर्यवंशी नावाचा एक तरुण दिग्दर्शक. रोहित सर प्रेमाने सिनेमा करण्याची गळ घालतात परंतु विहानच्या तोंडून कथा ऐकल्यानंतर एक उत्तम प्रेमळ गोष्ट ऐकल्याचा आणि त्या गोष्टीतल्या तरुणाच्या प्रेमळ चाचाची भूमिका करण्याची अनोखी संधी मिळाल्याचा आनंद होतो. चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात उत्तम पार पडतं . मध्ये अनेक दिवस जातात आणि अचानक फोनवर समजतं की चित्रपट प्रदर्शित होतोय. एकीकडे आपण वेगळ्याच चित्रपटाचं हिमाचल प्रदेश येथे चित्रीकरण करताना या छोट्याशा ट्रेलर सोबत पुन्हा कोल्हापुरात येऊन धडकतो. चित्रपट या माध्यमाची हीच कमाल आहे. खरं तर तेजस्वी, करण आणि विहान या तिघांचा हा पहिला मराठी चित्रपट परंतु प्रदर्शित जरा वेळाने होतोय कारण चांगल्या गोष्टी मुरायला आणि साध्य व्हायला वेळ लागतोच. सर्वाँना शुभेच्छा!! कसा वाटतोय ट्रेलर कळवा”, असं जितेंद्रने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”

जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विहान सुर्यवंशी यांनी केलं आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशीसह अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, करण किशोर, वनिता खरात, प्रसाद जवादे हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १४ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.