अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या दमदार अभिनयाबरोबर दिग्दर्शन, लेखन या कौशल्याने देखील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नव्हे तर तो उत्कृष्ट निर्माता देखील आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या चिन्मय त्याच्या मुलाच्या नावामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

‘भारत सोडून जा’, ‘अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात राहायला जा’, असे मेसेज केले जात आहेत. हे पाहून चिन्मयची पत्नी नेहा मांडलेकर भडकली. तिने काही दिवसांपूर्वी ट्रोलिंगचे स्क्रीनशॉर्ट शेअर करून सडेतोड उत्तर दिलं होतं. पण अजूनही ट्रोलिंग सुरुच आहे. आज संतापून नेहाने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने नावाच्या अर्थासह जात वगैरे सगळं सांगितली. चिन्मयची पत्नी नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या.

Marathi actor pushkar Shrotri talk about trolling
“आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही,” चिन्मय मांडलेकर, क्षिती जोगच्या ट्रोलिंगवरून भडकला पुष्कर श्रोत्री, म्हणाला, “ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत…”
mahesh manjrekar reacts on trolling
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
actor chinmay mandlekar trolled marathi news
चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना शिवराय समजले आहेत का?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
when Tanvi Azmi married Baba Azmi
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”

हेही वाचा – ‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव

व्हिडीओत नेहा मांडलेकर म्हणाली, “नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. माझी जात आधी सांगते, कारण सध्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी द्वेष्टा कासार आहे. मी हिंदू आहे. हा व्हिडीओ करण्यामागचं एकच कारण आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. माझे पती, त्यांचं नाव चिन्मय दिपक मांडलेकर त्यांची जात द्वेष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर खूप सारं ट्रोलिंगला आम्ही सामोर जातोय. माझे पती हे पब्लिक फिगर आहेत. त्यांचं काम हे रसिक मायबाप पाहतात, ते काम आवडलं तर त्यांना रसिक मायबाप डोक्यावर घेतात आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की, त्यांनी त्यांची कानउघडणी करावी. कारण कलाकार हा सतत पब्लिक आयमध्ये असतो; जे मान्य आहे. पण सध्या ट्रोलिंग माझ्या पतीच्या कामाबद्दल होतं नाहीये. तर ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावरून होतंय.”

“माझा पती पब्लिक फिगर आहे म्हणून त्याच्या मुलाच्या नावाचा रस घेऊन चर्वण करायचा हक्क नाहीये. पण लोकांनी तोही ओरबडून घेतला असेल. तरीही हा व्हिडीओ मुद्दाम मी एवढ्यासाठी करतेय लोकांना हे आठवण करून द्यायला की, त्या मुलाला एक आईसुद्धा आहे. जी कलाकार नाहीये. जी पब्लिक आयमध्ये नसते. जी पब्लिक फिगर नाहीये. तिला आणि तिच्या मुलांची प्रायव्हसी जपण्याचा पूर्ण हक्क आहे. अनेकदा काय होतं, मोबाइलमध्ये टाइप करताना विसरतो की, पलीकडे एक माणूस ही गोष्ट वाचणार आहे. हे फक्त सगळं एखाद्या रोबॉटिक पॉटला फक्त वाचावं लागणार नाहीये. एक माणूस ते वाचतो. ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं जातंय, तो एक दहा-अकरा वर्षांचा मुलगा आहे. बरं का ट्रोल होतंय? तर त्याचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ नाव कधी ठेवलं आता सगळंच सांगते. कारण की मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक म्हणून खरंतर कोणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधिल नाहीये. पण मलाच असं वाटलं की, अज्ञानातून हे ट्रोलिंग होतं असेल. तर माझी ही जबाबदारी आहे अज्ञान दूर करावं. म्हणून हा व्हिडीओ आणि खटाटोप करतेय.”

“तर माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे. ‘जहांगीर’ हे पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ला झाला. २१ मार्चला जमशेदी नवरोज असतो. तुम्ही कॅलेंडर उघडून बघू शकता. त्या जमशेदी नवरोज दिवशी त्याचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir) असं ठेवलं गेलं. नाव कोणावरून ठेवलं? कसं ठेवलं? तो मुद्दा नंतर येतो. मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे. ‘जहांगीर’ म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला ‘जहांगीर’. तर मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलाची नावं कशी ठेवतात. मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्या नावाचा अर्थ फार गोड आहे, म्हणून ठेवली आहेत. शिवाय भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही ‘जहांगीर’ आहे. टाटा कुटुंब माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी कुटुंब संस्था आहे. ‘जहांगीर’ या नावाचा अर्थ आवडला. अनेक पालक आपल्या मुलाचं नाव अर्थ आवडला आणि अर्थपूर्ण ठेवतात. आता या भारतात असलेले प्रत्येक अक्षय याचं नाव काय त्यांच्या पालकांनी अक्षय कुमारवरून ठेवलं नसेल ना. अक्षय या शब्दाचा अर्थ आवडला असेल. आता सुचवणारे असे ही सुचवतात की, जगज्जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं? किंवा तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं? त्याचेही अर्थ असे होतात. तर तो हक्क आम्हाला पालक म्हणून असावा.”

हेही वाचा – Video: ‘कन्यादान’ फेम अभिनेत्री लवकरच होणार पुण्याची सून; हातावर रेखाटले प्रेमाचे खास क्षण, पाहा सुंदर मेहंदी

“बरं दुःख काय आहे; हे मुस्लिम नाव आहे. आपण तो देश आहोत की, आपण शतकानु शतके मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र राहतो. अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यात बघाल तरी आपले सुपरस्टार्स देखील मुसलमान आहेत. क्रिकेटर्स देखील मुसलमान आहेत. या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचा हजार, करोडमध्ये आपण त्यांना व्यवसाय करून देतो. ते चालतं? माझ्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ आहे आणि ते किती वर्ष चालणार आहे. माझ्या नवऱ्याने बिट्टा कराटे पात्र साकारलं. तर म्हणतात, रोल फारच सिरियसली घेतला. नाव लगेच मुस्लिम ठेवलं. बिट्टा कराटेचं पात्र साकारायच्या आठ वर्ष आधी नाव ठेवलं होतं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तर म्हणतात हा काय स्क्रीनवर जिरेटोप घातलो. पण मुलाचं नाव ‘जहांगीर’चं ठेवलं. तर स्क्रीनवर जिरेटोप घालण्याआधी माझ्या मुलाचा जन्म झाला. तेव्हा त्याचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं होतं. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवून आम्ही चूक नाही केली. तो हक्क आम्हाला आहे.”

“पण आम्हाला हे एक कळलं, महाराजांवर किंवा महाराजांच्या शिकवणीवर कितीही श्रद्धा असली, कितीही प्रेम असलं, आमच्या घरात महाराजांच्या किती प्रतिमा असल्या, बोलताना महाराजांच्या धाडसाचे दाखले आमच्या मुलांना देत असलो तरी या देशात अपुऱ्या आहेत. कारण या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचा अधिकार सगळ्यांकडे नाहीत. ते आमच्याकडे नाही. शिवाय पात्र स्क्रीनवर करण्याचा हक्क नाही. तर यासाठी मी उभा महाराष्ट्राची माफी मागते की, आम्ही आमच्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ असून सुद्धा स्क्रीन महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं. आम्हाला क्षमा करा. आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलेलं की, महाराज हे एका नटाच्या नावाच्या पलीकडे आहेत. त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. आम्ही चुकलो, आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं.”

“आज सकाळीच एक सद्गृहस्थांचा मेसेज आला की, ‘हा देश सोडून जा. तुम्ही अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये जाऊ राहा.’ ते वाचलं आणि वाईट वाटलं. अनेक लोक सल्ले देतात, ट्रोलर्स काय मनावर घ्यायचं. पण जसं मी मगाशी बोलले मोबाइलच्या पलीकडे एक माणूस वाचत असतो. तसं हे मी नाही विसरू शकत की फोनच्या अलीकडे एक माणूसच टाईप करतोय. या देशातल्या एका व्यक्तीला, मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा, असं सांगण्याचा सल्ला द्यावासा वाटला. याचं मला वाईट वाटलं, याची मला खंत आहे आणि म्हणून हा व्हिडीओ आहे. परत कोणी मला असला सल्ला देऊन नये. मी भारतीय आहे, माझा नवरा भारतीय आहे, माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत. जेआरडी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतला आहे. तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. या व्हिडीओनंतर ट्रोलिंग थांबणार आहे का? तर अजिबात नाही. वाढणार? तर हो, निश्चित दुप्पटीने वाढणार आहे. खूप मेसेज येणार आहेत. पण आता माझ्याकडून मी माझं काम केलंय, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. धन्यवाद,” असं नेहा मांडलेकर म्हणाली.

हेही वाचा – ‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या

दरम्यान, याआधीही चिन्मय मांडलेकरला मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हा चिन्मयने स्वतः मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवण्यामागचा हेतू स्पष्ट करून ट्रोलर्सचं तोडं बंद केलं होतं. पण आता पुन्हा एकदा चिन्मयच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केलं जात आहे.