मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या कलाकारांच्या यादीत चिन्मय मांडलेकर याचे नाव घेतले जाते. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती अशा अनेक बाजू तो समर्थपणे सांभाळताना दिसतो. यावर्षी तो ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता तो अगदी वेगळ्या रूपात आपल्याला भेटायला सज्ज झाला आहे.

आणखी वाचा : “आम्ही जिथे जातो तिथे…”; दुबईत दिवाळी साजरी करण्यावरून टोमणे मारणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ही भूमिका साकारत आहे.

व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. चिन्मय यांचा फ्रेश आणि वेगळा लुक लक्ष वेधुन घेतोय, त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे. सुपरहिट चित्रपट ‘झिम्मा’च्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे.

हेही वाचा : ‘#घरापासून_दूर तुम्हाला काय वाटतं?’ मराठी सिनेसृष्टीचा आगळावेगळा ट्रेंड; आठवणी सांगताना कलाकार भावूक

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.