ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचनादीदींच्या निधनानंतर सगळ्या स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “सात्विक सौंदर्य स्वर्गात परतलं!” सुलोचना दीदींच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा

सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज (५ मे) रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. कलाकारांसह अनेक नेते मंडळीं सुलोचना दीदींच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतलं आहे.

हेही वाचा- “अनेकांच्या मनातील वात्सल्यमूर्ती हरपली”; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

सुलोचना दीदींच्या निधनाची बातमी कळताच कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. अनेकांनी ट्वीट करत सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली होती. केंदीय मंत्री नितीन गडकरींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde and raj thackeray visited sulochana didi last last rites will perform at evening dpj
First published on: 05-06-2023 at 12:23 IST