‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रमुख भूमिका असलेला हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात काम करताना अनुभव कसा होता यावर त्याने भाष्य केलं आहे.

या चित्रपटातील अभिनेत्री ईशा केसकर अंडी ओंकार भोजने यांनी नुकतेच इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन घेतले होते. यात त्यांनी आपल्या चाहत्यांशी, प्रेक्षकांशी संवाद साधला. चित्रपटाची अनुभवाविषयी बोलताना ओंकार म्हणाला, “चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप छान होता. उत्तम टीम बरोबर काम केल्याने अनुभव चांगलं येतो, चित्रपट पाहिल्यानंतर मला माझ्या जवळच्या मित्रांनी फोन करून सरला ( ईशाची) चौकशी केली.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

गर्लफ्रेंडबद्दलचा प्रश्न विचारताच ओंकार भोजने लाजत म्हणाला, “मी…”

‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, ईशा  केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे.