'सरला एक कोटी' चित्रपटातील अनुभवावर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया; म्हणाला, "माझे मित्र ईशाबद्दल...." spg 93 | comedy actor omkar bhojane talking about actress isha kesakar ans their marathi film | Loksatta

‘सरला एक कोटी’ चित्रपटातील अनुभवावर ओंकार भोजनेची प्रतिक्रिया; म्हणाला, “माझे मित्र ईशाबद्दल….”

काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला

omkar bhojne
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. काही दिवसांपूर्वीच ओंकार भोजनेचा ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रमुख भूमिका असलेला हा त्याचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात काम करताना अनुभव कसा होता यावर त्याने भाष्य केलं आहे.

या चित्रपटातील अभिनेत्री ईशा केसकर अंडी ओंकार भोजने यांनी नुकतेच इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन घेतले होते. यात त्यांनी आपल्या चाहत्यांशी, प्रेक्षकांशी संवाद साधला. चित्रपटाची अनुभवाविषयी बोलताना ओंकार म्हणाला, “चित्रपटात काम करण्याचा अनुभव खूप छान होता. उत्तम टीम बरोबर काम केल्याने अनुभव चांगलं येतो, चित्रपट पाहिल्यानंतर मला माझ्या जवळच्या मित्रांनी फोन करून सरला ( ईशाची) चौकशी केली.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

गर्लफ्रेंडबद्दलचा प्रश्न विचारताच ओंकार भोजने लाजत म्हणाला, “मी…”

‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, ईशा  केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची कथा ग्रामीण भागावर आधारित असल्याचं टीझर पाहिल्यानंतर लक्षात येतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 17:13 IST
Next Story
शाहरुख खानच्या ‘पठाण’मुळे रितेश देशमुखच्या ‘वेड’सह इतर मराठी चित्रपटांना फटका बसणार? थिएटर मिळत नसल्याच्या चर्चा