डान्सर गौतमी पाटीलचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. खरं तर गौतमी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बऱ्याचदा तिच्या डान्स कार्यक्रमात गोंधळ व राडे होत असतात. ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने तिच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

गौतमीने अवघ्या काही सेकंदाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात ती ‘आलं बाई दाजी माझं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्याबरोबर इतर काही मुली देखील पारंपरिक मराठी पोशाखात या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शूटिंगचा असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर चाहते नाराजी व्यक्त करत आहेत, कारण हे गाणं एका किल्ल्यात शूट करण्यात आल्याचं दिसतंय.

गौतमीने शेअर केलेल्या व्हिडीओत किल्ल्याचा एक भाग दिसतोय, हा व्हिडीओ पाहिल्यावर युजर्स कमेंट करून संताप व्यक्त करत आहेत. ‘छान अशीच वाढवा आमच्या गडकिल्ल्यांची शोभा’, ‘शिवाजी महाराजांची थोडीशी तरी इज्जत ठेवा’, ‘मला माहित आहे तुम्ही जे करता ती तुमची कला आहे, पण गड किल्ल्यांवर असे डान्स शूट करू नका मॅडम,’ ‘ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाही…हे गडकिल्ले महाराजाची आणि महाराष्ट्राची शान आहे समजलं का?’ ‘गड किल्ल्यांवर अशी गाणी करणे अयोग्य आहे. दुसरी ठिकाणं मिळाली नाही का?’ अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

Video: “तू नाचलीस ना बास झालं…”, गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, “जरातरी लाजावं की…”

gautami patil dancing in fort video viral 1
गौतमी पाटीलच्या व्हिडीओवरील कमेंट्स

‘गडकिल्ल्यांवर खपवून घेतली जाणार नाही अश्लीलता’, ‘गडकिल्ल्यावर कधी बाई नाचली नाही तुमचा हा नाच्या कार्यक्रम पायथ्याशी दाखवा’, ‘जगाच्या इतिहासातील एकमेव असा राजा ज्याच्या दरबारात कधीही कुठली स्त्री नाचली नाही ते म्हणजे श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज… ज्या गड-किल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले त्या गड-किल्ल्यांवरती जाऊन तुम्ही असले चाळे करतायेत लाजा वाटू द्या हे गड किल्ले महाराष्ट्राची शान आहेत,’ ‘गड संवर्धनाचं काही काम असेल किल्ल्यासाठी तर पुढे न येणार पुढे राहतात कोण? तो प्रोडूसर कोण आहे तो निर्माता त्याला अक्कल आहे का दलिंदर कुठले, गडकिल्ल्यावर बिलकुल असे तमाशा चालणार नाही किल्यावर,’ अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

gautami patil brutally trolled for dancing
गौतमी पाटीलच्या व्हिडीओवरील कमेंट्स

दरम्यान, गौतमीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पण त्यांनी ज्याठिकाणी शूटिंग केलं तो खरा किल्ला होता की सेट उभारला होता, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण व्हिडीओत किल्ला पाहून नेटकरी संतापले आहेत.