Ajit Pawar Dies in Baramati Plane Crash : महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालं आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार हे आज ( २८ जानेवारी ) सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीला सभा घेण्यासाठी येत होते. यावेळी हा भीषण विमान अपघात झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी पोस्ट शेअर करत अजित दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता पुष्कर जोगची पोस्ट

“महाराष्ट्राचं राजकारण तुमच्याशिवाय अपूर्ण आहे…महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमची अत्यंत गरज होती…तुमचा मिश्किल पण तितकाच थेट स्वभाव यामुळे सगळेच तुमचे चाहते होते. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे खूप धक्कादायक आहे…अजित दादा भावपूर्ण श्रद्धांजली. मोठा नेता गेला.” असं पुष्करने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Award Banner
pushkar jog
पुष्कर जोगची पोस्ट ( Pushkar Jog Post )

दरम्यान, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे अजित पवार यांचं विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळलं. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच “या विमान अपघाताची आम्ही चौकशी करणार आहोत. आमच्या सहकाऱ्याचा जीव गेला आहे. त्यामुळे नक्कीच विमान अपघाताची चौकशी होणार” अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.