अॅक्शनचा दमदार तडका असलेला 'अंकुश' हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कथानकाला प्रेमकथेची जोड असलेल्या या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पडला. सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम आणि काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणासमोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार 'अंकुश' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये धडाकेबाज अॅक्शन पाहायला मिळत आहे. त्यासोबतच गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकरचा बोल्ड लूकही पाहायला मिळत आहे.आणखी वाचा : “मला नाही आवडत ते…”, ‘ताली’ पाहिल्यानंतर सखी गोखलेने सुव्रतला दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाली “आजूबाजूला स्त्रिया…” आणखी वाचा : “तू लग्नात कोणता उखाणा घेतला होतास?” सखी गोखलेला विचारलेल्या प्रश्नावर सुव्रत जोशी म्हणाला, “तिने…” ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले 'अंकुश' या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची आहे. तर दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे. या चित्रपटात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे, शशांक शेंडे, गौरव मोरे, नागेश भोसले, पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.