अभिनेते महेश कोठारे यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अजूनही महेश कोठारे यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांनी आता त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. महेश कोठारे यांचं ‘डॅमइट आणि बरंच काही’ पुस्तक प्रकाशित झालं आहे.

आणखी वाचा – “त्याच मुलीबरोबर तो…” शिव ठाकरेच्या लग्नाबाबत आईचा खुलासा, लेकाच्या रिलेशनशिपबाबतही केलं भाष्य

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

महेश कोठारे यांच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महेश कोठारे यांच्या पुस्तकाचं कौतुक केलं. तसेच त्यांनी महेश कोठारे यांच्या चित्रपटाबाबत, मराठी चित्रपटांबाबतही भाष्य केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मला आठवतं की मी नववीमध्ये होतो. दहावीकरता कोणता तरी क्लास केला पाहिजे त्यासाठी मी पुण्यामध्ये गेलो होतो. मला त्या क्लासमध्ये जाण्याचा कोणताच रस नव्हता. त्यावेळीच ‘धुमधडाका’ चित्रपट लागला होता. आम्ही सगळे भावंड हा चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. मी नागपूरचा आहे आणि मराठी चित्रपट, नाटकं नागपूरला थोडी उशीरा पोचायची.”

“कारण तिथे हिंदीचा जास्त बोलबाला होता. पण लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेशजी या लोकांमुळेच आम्हाला मराठी चित्रपटांचा, नाटकांचा गोडवा लागला. आता कुठला मराठी चित्रपट येणार? याची अक्षरशः आम्ही वाट बघायचो. मला असं वाटतं की, या कलाकारांनी मराठी चित्रपटांची तेव्हा जी पद्धत होती ती बदलण्याचं काम केलं. तसेच एक अतिशय वेगळेपण चित्रपटांमध्ये आणलं. तेव्हाच्या नव्या पिढीला मराठी चित्रपटांशी जोडण्याचं काम केलं.” देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाबाबत महेश कोठारे यांच्याबाबत भरभरुन बोलत होते.