‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवारने प्रवीण तरडेंबरोबरचा फोटो शेअर केली आहे. यामधून त्याने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना त्यांच्या स्वभावाचं वर्णन करत त्यांचं कौतुकही केलं. धनंजय पोवारने प्रवीण तरडेंचा उल्लेख करत बाहेरुन कठोर दिसणारी व्यक्ती खूप मायाळू असते असंही म्हटल आहे.
धनंजय पोवारने केलं प्रवीण तरडेंचं कौतुक
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअऱ करत धनंजय पोवार कॅप्शनमधून म्हणाला, “सरांबरोबर काम करत असताना इतक्या गोष्टी शिकायला मिळतात; म्हणजे सरांचा अभ्यास आणि अभिनय, सरांची अभिनय करण्याची पद्धत, अभिनय करत असताना सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची पद्धत… म्हणजे खूप काही शिकायला मिळतं. व्यक्ती जितकी कठोर दिसते ना, त्याहीपेक्षा ती किती मायाळू आहे, प्रत्येक लहान-मोठ्या कलाकाराचा सन्मान करणारी आहे हे यात दिसतं. प्रत्येक कलाकाराबद्दल त्यांच्या मनामध्ये इतकं प्रेम आहे! मी लांबून बघितलेले प्रवीण तरडे आणि सोबत काम करताना पाहिलेले प्रवीण तरडे अविश्वसनीय असे आहेत.”
धनंजय पोवार आगामी ‘जय श्रीराम’ चित्रपटात झळकणार असून. राम खाटमोडे, सागर पाठक दिग्दर्शित या चित्रपटातून तो महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळणार असल्याची चर्चा आहे. प्रवीण तरडेंनीही सोशल मीडियावरुन या चित्रपटाच्या टीमला सुभेच्छा दिल्या. चित्रपटाचा मुहूर्त पार पडताना ते तिथे उपस्थित होते.
‘जय श्रीराम’ चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, रमेश परदेशी, धनंजय पोवार ही मंडळी झळकणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नसून सध्या चित्रपटाचं काम सुरू आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे येत्या काळातच कळेल.
