Dhiraj Deshmukh post for Raja Shivaji Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, रितेशचे भाऊ आणि आमदार धिरज देशमुख यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रितेशच्या दोन्ही मुलांची झलक पाहायला मिळत असून, एका गाण्यात धिरज देशमुख यांनीही हजेरी लावली आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट असल्याचे धिरज यांनी नमूद केले आहे.

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमा ‘राजा शिवाजी’ला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटात रितेशच्या दोन्ही मुलांची झलक दिसली. इतकंच नाही तर या सिनेमातील गाण्यात धिरज देशमुखांचही झलकही पाहायला मिळाली. ‘राजा शिवाजी’ प्रदर्शित झाल्यानंतर धिरज देशमुखांनी केलेल्या खास पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळतेय. रितेश देशमुखचं अनेक वर्षांचं स्वप्न अखेर मोठ्या पडद्यावर आलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने देशमुख कुटुंबीयही रितेश व जिनिलीयाचं कौतुक करताना दिसत आहेत. राजा शिवाजी रिलीज झाल्यावर धिरज देशमुखांनी रितेश व जिनिलीयाचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.

धिरज देशमुखांची पोस्ट

दादा, वहिनी…
आपण राजा शिवाजी हा चित्रपट निर्माण करून आजच्या व पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
अशा महान व्यक्तिमत्त्वावर चित्रपट उभा करण्यामागे आपण घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद आहेत.
प्रत्येक परिवाराने आपल्या मुलांसह पाहावा असा हा उत्कृष्ट चित्रपट आहे.
या सुंदर कलाकृतीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही त्यानेच सांभाळली आहे. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया या चित्रपटाची निर्माती आहे. इतकंच नाही तर तिने सईबाईंची भूमिका केली आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, राहिल देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, अभिनेत्री भाग्यश्रीसह अनेक कलाकारांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात अभिनेता सलमान खानने कॅमिओ केला आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट हिंदी, मराठी व तेलुगू या तीन भाषेत रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. रितेशने सिनेमाची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.