scorecardresearch

महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेला मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, सत्या मांजरेकर म्हणाला “तुझे खूप…”

‘कुटुंब’ या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

satya manjrekar gauri ingawale
सत्य मांजरेकर गौरी इंगावले

मराठी कलाविश्वातील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून महेश मांजरेकर यांच्याकडे पाहिलं जातं. महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर हे कायमच चर्चेत असतात. महेश मांजरेकर यांनी ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरुण’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. पांघरुण या चित्रपटात महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिचा भाऊ सत्या मांजरेकरने तिचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून महेश मांजरेकरांचा मुलगा सत्यची एक्झिट? एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच सत्या मांजरेकरांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने गौरीचे कौतुक केले आहे.

सत्या मांजरेकरची पोस्ट

सत्याने ‘पांघरुण’ या चित्रपटाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने त्याला कॅप्शन देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “गौरी तुला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा अॅवॉर्ड मिळाला, त्याबद्दल तुझे खूप कौतुक”, असे सत्याने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

दरम्यान गौरीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘कुटुंब’ या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. गौरीने काही नाटकांमध्येही काम केलं आहे. ‘ओवी’ या नाटकात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या नाटकाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होते. त्यात अभिनेत्री हेमांगी कवीने गौरीसोबत स्क्रीन शेअर केली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 13:51 IST

संबंधित बातम्या