Premium

“मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने “नागराज मंजुळे त्याच्या चित्रपटात आकाश ठोसरला घेतोच,” असं म्हटलं होतं.

nagraj manjule

दिग्दर्शक नागराज मंजुळे आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. समाजातील त्यांना खुपणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी विविध माध्यमातून ते व्यक्त करत असतात. आतापर्यंत मराठी इंडस्ट्रीतीलही अनेक गोष्टींबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. आता मराठी मनोरंजन सृष्टीतील कंपुशाहीबाबत त्यांनी त्यांचं मत मांडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागराज मंजुळे सध्या त्यांच्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्या निमित्ताने ते सध्या अनेक मुलाखती देत आहेत. आता ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कंपुशाहीवर भाष्य केलं.

आणखी वाचा : Video : सयाजी शिंदेंची हटके भूमिका, नागराज मंजुळे यांचा डॅशिंग अवतार; बहुचर्चित ‘घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने “नागराज मंजुळे त्याच्या चित्रपटात आकाश ठोसरला घेतोच,” असं म्हटलं होतं. तिच्या या विधानाची खूप चर्चा झाली होती. आता नागराज मंजुळे यांना “मराठी मनोरंजन सृष्टीत कंपुशाही आहे का? किंवा कम्फर्ट झोनसाठी ठराविक कलाकारांबरोबरच काम केलं जातं असं होतं का?” असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “तेजस्विनीच्या मताशी मी सहमत आहे. कम्फर्ट झोन सगळीकडे असतो. तेजस्विनी आणि संजय जाधव मुद्दाम एकत्र काम करतात असं नाही. त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली.”

हेही वाचा : ‘अभिनयाची आवड आधीपासूनच होती; पण..’

पुढे ते म्हणाले, “आता माझ्या गावाकडचे माझे मित्र हे अजूनही माझे चांगले मित्र आहेत. बळजबरीने मी अमेरिकेत जाऊन एखाद्याशी मैत्री करू शकत नाही. पण असंही नाही की या लोकांशिवाय काही काम करायचंच नाही. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही आहे असं मला वाटत नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 08:49 IST
Next Story
“आकाश ठोसर फ्लर्ट करतो का?” ‘घर बंदूक बिरयानी’ फेम अभिनेत्री म्हणाली…