Fussclass Dabhade : 'झिम्मा' चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २'ला देखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 'झिम्मा'च्या यशानंतर आता अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हेमंत सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाची हिंट चाहत्यांना देत होता. आता या सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. हेमंतने बुधवारी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत "स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शूट केलेला सिनेमा तुमच्या भेटीला येतोय सगळं उद्या सांगतोच…!" असं म्हटलं होतं आणि आज ( ५ सप्टेंबर ) या 'फसक्लास' ( Fussclass Dabhade ) चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हेमंत ढोमेच्या नव्या चित्रपटाचं नाव 'फसक्लास दाभाडे' ( Fussclass Dabhade ) असं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी पाहायला मिळेल असं पोस्टवर नमूद करण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि अभिनेत्री क्षिती जोग हे दमदार कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हेही वाचा : “लाज काढलीये या बाईईईने”, सुरेखा कुडची निक्कीवर संतापल्या; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून…” 'फसक्लास दाभाडे' ( Fussclass Dabhade ) चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करत सिद्धार्थ लिहितो, "झिम्माच्या टीमकडून नवी भेट… तुमच्या आमच्यातल्या सगळ्या भावंडांची… सोनू… पप्पू… तायडी आणि त्यांच्या इरसाल कुटुंबाची खुळ्यासारखी फसक्लास श्टोरी! १५ नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या ‘फसक्लास’ चित्रपटगृहात!" चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये क्षिती, सिद्धार्थ आणि अमेय वाघ ट्रॅक्टरवर बसून खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता यांच्या इरसाल स्टोरीत नेमकं काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : ८०० कोटींचे हिरे, बाप्पाचा कौल अन्…; यंदा कोकण रेल्वेने होणार गणपतीपुळेचा प्रवास! पाहा धमाकेदार ट्रेलर दरम्यान, चित्रपटाची घोषणा होताच, मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनिकेत विश्वासराव, मुग्धा गोडबोले, पर्ण पेठे, ललित प्रभाकर यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमेने केलं आहे. तर, निर्मितीची जबाबदारी क्षिती जोग व आनंद एल राय यांनी सांभाळली आहे. आता हा नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झिम्माप्रमाणे जादू दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.