गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया…., एक दोन तीन चार…गणपतीचा जयजयकार या जयघोषात आज लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. मोठ्या उत्साहात, जल्लोषात घरोघरी गणरायचं स्वागत होतं आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. मराठी कलाकार मंडळींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. सध्या अभिनेता सुबोध भावेच्या मुलांनी बाप्पासाठी केलेल्या आकर्षक देखाव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सुबोध भावेच्या घरी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान झालं आहेत. याचे फोटो सुबोधनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यंदा त्याच्या मुलांनी बाप्पासाठी ‘चांद्रयान-३’चा देखावा बनवला आहे. सुबोधनं शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये एकाबाजूला इस्रोच रॉकेट तर दुसऱ्या बाजूला चंद्र अन् विक्रम रोव्हर पाहायला मिळत आहेत. या दोघांमध्ये बाप्पा विराजमान झाल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सुबोधची मुलं देखाव्याबरोबर फोटो काढताना पाहायला मिळत आहेत.
सुबोधनं हे दोन्ही फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया…यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा “चांद्रयान-३”…श्री गणेश आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना…मोरया”
हेही वाचा – “हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष
हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
सुबोध भावेच्या मुलांनी बनवलेला हा देखावा पाहून नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी त्यांचं कौतुक केलं आहे. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “वाह… खूपच सुंदर, समर्पक व समयोचित देखावा. गणपती बाप्पा मोरया…तुम्हाला सर्वांना श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “छान वाटत हे बघताना.. कारण हे दुर्मीळच होत चाललंय.”
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 2023 marathi actor subodh bhave sons make chandrayaan 3 decoration pps