scorecardresearch

Premium

अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला दिल्या हेल्थ टिप्स; पाहा व्हिडीओ

अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीचा हा गोड व्हिडीओ व्हायरल

adinath kothare share daughter jija cute video
अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीचा हा गोड व्हिडीओ व्हायरल

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात काल लाडक्या गणरायचं आगमन झालं. घरोघरी लाडके बाप्पा विराजमान झाले. त्यामुळे पुढील ९ दिवस बाप्पाच्या आगमनामुळे मंगलमय आणि उत्साहाच वातावरण पाहायला मिळणार आहे. कलाकार मंडळींच्या घरी देखील गणराय विराजमान झाले आहेत. सोशल मीडियावर कलाकारांनी आपल्या घराच्या बाप्पाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. अशातच अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला हेल्थ टिप्स दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर दुर्दैवी घटना; लाइटमनचा विजेच्या झटक्याने मृत्यू

gayatri joshi accident
‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात
Marathi actor Adish Vaidya entry in Kavyanjali
Video: ‘काव्यांजली’ मालिकेत नव्या प्रीतमची जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ
spruha joshi made special ukdiche modak
Video : “खोबऱ्याचं सारण, सुंदर कळ्या अन्…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, पाहा व्हिडीओ
marathi actor swapnil joshi and deepti devi
स्वप्नील जोशीचा ‘या’ अभिनेत्रीबरोबर लंडनच्या ब्रीजवर रोमान्स; व्हिडिओ व्हायरल

अभिनेता आदिनाथ कोठारेनं लाडकी लेक जीजाबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जीजा ‘किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला, इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला’ हे गाणं गाताना दिसतं आहे. या व्हिडीओत जीजा गाणं गात असून आदिनाथ त्यावर अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: “जेलमध्ये जाऊन आला तरी सुधारला नाही” राज कुंद्रा आणि ईशा गुप्ताच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

आदिनाथने जीजाबरोबर हा व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, “जीजा आणि डॅडाकडून बाप्पाला हेल्थ टिप आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.”

हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरने रश्मिका मंदानाला केलं इग्नॉर?; नेटकरी म्हणाले, “बॉलीवूडमधील लोकांना जास्त अहंकार…”

हेही वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; म्हणाली, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला…”

आदिनाथ आणि जीजाच्या या गोड व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंजिरी ओक, माधव देवचके यांसारख्या कलाकारांनी जीजाच्या गोड व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच “किती गोड”, “खूप छान, काय ती एनर्जी” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh utsav 2023 adinath kothare share daughter jija hot video pps

First published on: 20-09-2023 at 15:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×