Premium

“दुसरी आई बनून तिने…”, वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठ्या बहिणीबद्दल बोलला गश्मीर महाजनी

गश्मीर महाजनीला आहे मोठी बहीण, चाहत्याने बहिणीबद्दल विचारताच अभिनेता म्हणाला…

gashmeer mahajani talks about sister rashmi mahajani
गश्मीर महाजनी बहीण रश्मीबद्दल काय म्हणाला?

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत रवींद्र महाजनी यांना दोन अपत्ये आहेत. त्यापैकी अभिनेता गश्मीर महाजनी आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पण त्यांच्या मुलीबद्दल व गश्मीरच्या बहिणीबद्दल फार लोकांना माहीत नाही. अभिनेता गश्मीर महाजनीला एक मोठी बहीण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाहत्याने थेट छत्रपती संभाजी महाराजांशी केली तुलना, गश्मीर महाजनी म्हणाला, “माझ्यात त्यांच्या…”

रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी माधवी यांना मोठी मुलगी असून तिचं नाव रश्मी आहे. रश्मी गश्मीरपेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. ती अभिनयसृष्टीच्या झगमगाटापासून दूर आहे. रविवारी गश्मीरने ‘Ask Gash’ हे सेशन इन्स्टाग्रामवर ठेवलं होतं. यावेळी एका चाहत्याने त्याला त्याच्या बहिणीबद्दल प्रश्न विचारला. गश्मीरने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि बहिणीबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या. गश्मीरने यापूर्वीही अनेकदा इन्स्टाग्रामवर बहिणीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

कोण आहे रवींद्र महाजनींची मुलगी? गश्मीरने शेअर केलेले बहिणीचे फोटो पाहिलेत का?

‘तुमच्या आणि तुमच्या बहिणीच्या बाँडबद्दल सांगा’, असं एका चाहत्याने गश्मीरला विचारलं. त्यावर तो म्हणाला, “तिने मला दुसरी आई बनून मोठं केलं. माझ्या अम्मीप्रमाणेच ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.”

गश्मीर महाजनीची पोस्ट

दरम्यान, एका राखी पौर्णिमेला गश्मीरने बहिणीबद्दल पोस्ट शेअर केली होती. “माझी बहीण माझ्याहून १३ वर्षांनी मोठी. माझी छोटी आईच ती! K.G. पासून ते पाचवी पर्यंत – माझा डब्बा भरणे, मला शाळेसाठी तयार करणे, मला तिच्या कायनेटिक होंडा वरुन शाळेत सोडणे – तिनेच केले. हिरो होण्याकरता मला सिनेसृष्टीत येण्याची गरज नव्हती. जन्मापासूनच मी तिचा स्टार होतो,” असं कॅप्शन गश्मीरने बहिणीबरोबरचे फोटो शेअर करत दिलं होतं.

गश्मीरची बहीण रश्मी विवाहीत आहे. ती गश्मीरपेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे. गश्मीर बऱ्याचदा त्याच्या मोठ्या बहिणीबरोबरचे फोटो शेअर करतो.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gashmeer mahajani talks about elder sister rashmi mahajani calls her second mother hrc

First published on: 11-09-2023 at 10:56 IST
Next Story
Video: सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज, गाडीची खास झलक दाखवत म्हणाले…