Gashmeer Mahajani shares post: लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच एका शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘१०८ बेस हॉस्पिटल उरी’ असे या शोचे नाव आहे. या मालिकेतील गश्मीरचा लूक, त्याचा वेगळा अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेच्या प्रोमोंवर प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत.
गश्मीर महाजनी पोस्ट शेअर करत म्हणाला…
आता या सगळ्यात गश्मीर महाजनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गश्मीरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याचा फोटो पाहायला मिळत आहे. तो पाठमोरा उभा आहे. आजूबाजूला अंधार दिसत आहे. त्यावर “माझा आवडता प्राणी- माझे बाबा”, असे लिहिले आहे. हा फोटो शेअर करताना त्याने शूटिंग सुरू झाल्याची इमोजी शेअर केली आहे.
आता गश्मीरचा हा नवीन प्रोजेक्ट आहे का? तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तो कोणत्या सिनेमातून किंवा वेब सीरिजमधून भेटीला येणार आहे, याबद्दल काहीही खुलासा केला नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. गश्मीरच्या या फोटोमागे काय रहस्य आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह! गश्मीर, तू तुझ्या नवीन सिनेमाचे शूटिंग सुरू केलेस. खूप छान”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “गश्मीरला भगवान विष्णूंची भूमिका साकारताना बघायला मला नक्की आवडेल”, तर इतर अनेक नेटकऱ्यांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. आता गश्मीर त्याच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल कधी सांगणार, कधी खुलासा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


गश्मीर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्यांच्या अनेकविध प्रश्नांची उत्तरे देतो. यामध्ये अनेकजण त्याच्या फिटनेसपासून, आवडता सिनेमा, पुस्तके, कलाकार, मानसिक आरोग्य, त्याचा मुलगा अशा अनेक गोष्टींबद्दल विचारतात. तर अनेकजण गश्मीरला कायमच तो आगामी कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याबद्दल विचारतात. आता चाहत्यांची गश्मीरला नवीन भूमिकेत पाहण्याची इच्छा पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, गश्मीर नुकताच देऊळ बंद २ मध्ये दिसला होता. तसेच, १०८ बेस हॉस्पिटल उरीमधील त्याची नवीन भूमिका प्रेक्षकांची मने जिंकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
