scorecardresearch

मराठीतील प्रसिद्ध संगीतकाराच्या लावणीमध्ये झळकणार गौतमी पाटील! गायकाबरोबरचा ‘तो’ फोटो व्हायरल

“ओ शेठ…” मराठीतील प्रसिद्ध संगीतकाराकडून गौतमी पाटीलला लावणीची ऑफर

gautami patil in urtksarsh shinde lawani
मराठीतील प्रसिद्ध संगीतकाराकडून गौतमी पाटीलला लावणीची ऑफर. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमी चाहता वर्ग मोठा आहे. अनके समारंभांना गौतमीचे लावणी कार्यक्रम आयोजित केले जातात. गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दीही झालेली पाहायला मिळते. तिच्या लावणी कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

गौतमीच्या कार्यक्रमांबरोबरच तिच्या लावणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. गौतमीची लोकप्रियता व तिच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून मराठीतील प्रसिद्ध गायकाकडून गौतमीला गाण्याची ऑफर मिळाली आहे. गायक आनंद शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदेच्या गाण्यात गौतमी झळकणार आहे.

हेही वाचा>> ऑस्कर मिळाल्यानंतर सोशल मीडियावर ‘नाटू नाटू’चीच हवा, गुगलवर गाणं ट्रेंड झालं अन्…

हेही वाचा>> “राम आणि सितेचं नाव असल्यानेच…”, नाटू नाटूला ऑस्कर मिळाल्यानंतर साध्वी प्राचींचा अजब दावा; नेटकरी म्हणाले, “मग मोदींना…”

उत्कर्ष शिंदेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे. गौतमीबरोबरचे काही फोटो उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोला त्याने “अहो शेट लय दिसान झालीया भेट…ह्या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणीनंतर ह्यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी…माझं नवं लिखाण नवं संगीत नव्या गायकेसोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार…लवकरच”, असं कॅप्शन उत्कर्षने या फोटोला दिलं आहे.

हेही वाचा>> “तलवार व पेट्रोल बॉम्ब घेऊन आमच्या घराबाहेर…” तापसी पन्नूने सांगितला दंगलीचा थरारक प्रसंग

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’तून प्रसिद्धीझोतात आलेला उत्कर्ष शिंदे पेशाने डॉक्टर आहे. तो उत्तम गायकही आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटातही उत्कर्ष महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 10:22 IST