Genelia Deshmukh Raksha Bandhan Video: बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुखने नेहमीप्रमाणे यंदाचा रक्षाबंधनाचा सण अत्यंत प्रेमाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला आहे. कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून जिनिलीयाने तिचा भाऊ निगेल डिसूझा याला राखी बांधली. या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये निगेलने दिलेली भेटवस्तू जिनिलीया सुरुवातीला नाकारताना दिसते, पण लहान मुलांच्या मध्यस्थीनंतर ती लिफाफा स्वीकारते.
अभिनेत्री जिनिलीया देशमुख व तिचा भाऊ निगेल डिसूझासाठी रक्षाबंधनाचा सण नेहमीच खास असतो. कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून जिनिलीया दरवर्षी आपल्या भावाला राखी बांधते आणि त्यांच्या बालपणातील आठवणींना उजाळा देते. सोशल मीडियावरही जिनिलीया अनेकदा निगेलबरोबरचे फोटो शेअर करून त्याच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करत असते.
व्हिडीओमध्ये दिसतंय की जिनिलीया तिच्या भावाला राखी बांधते. त्यानंतर भाऊ तिचे आशीर्वाद घेतो आणि लिफाफा देतो. पण जिनिलीया घेत नाही. त्यानंतर निगेल लहानग्यांची मदत घेतो. मुलं आजुबाजूला जमल्यानंतर जिनिलीया तो लिफाफा घेते. मोठ्या बहिणीनेच गिफ्ट द्यायचे असतात, पण यावेळी मात्र भावाने ते केलं, असं म्हणत जिनिलीयाने भावाबरोबरचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
मोठ्या बहिणीनेच नेहमी हट्ट पुरवायचे असतात, पण या वेळी…
“मोठ्या बहिणीनेच नेहमी भेटवस्तू द्यायची आणि हट्ट पुरवायचे असतात. पण या वेळी निगु पिगुने लहानग्यांची मदत घेतली आणि मी पूर्णपणे हार मानली. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा निगु पिगु! मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असेन”, असं कॅप्शन देत जिनिलीया देशमुखने व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पाहा जिनिलीया व निगेल डिसूझाचा व्हिडीओ
काय करतो निगेल डिसूझा?
जिनिलीयाच्या भावाचे नाव निगेल डिसूझा आहे. तो हा कॉर्पोरेट आणि मीडिया क्षेत्रात कार्यरत असून, तो एक यशस्वी पत्रकार आणि रिसर्च ॲनालिस्ट म्हणून ओळखला जातो. जिनिलीया आणि निगेल या भावंडांमध्ये अतिशय घट्ट आणि प्रेमाचं नातं आहे.
दरम्यान, देशमुख कुटुंबाने एकत्र येत रक्षाबंधनचा सण साजरा केला. अमित देशमुख व त्यांची पत्नी अदिती देशमुख व त्यांची मुलं, रितेश व जिनिलीया आणि त्यांची मुलं, धिरज देशमुख व दीपशिखा देखमुख आणि त्यांची मुलं, त्याचबरोबर जिनिलीयाचे दादा-वहिनी व त्यांची मुलं आणि दीपशिखाचा भाऊ जॅकी भगनानी या सर्वांनी मुंबईत एकत्र रक्षाबंधनचा सण साजरा केला. दीपशिखा देशमुख व जिनिलीया यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या सेलिब्रेशनची झलक सर्वांना दाखवली.
